भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचे आपण सगळेच चाहते आहोत. आजही नव्या अभिनेत्याला लाजवेल असा अमिताभ यांचा उत्साह आणि मेहनत करायची जिद्द पाहून भलेभले चकित होतात. ‘Angry Young Man’ बनून ‘दीवार’, ‘शोले’, ‘काला पत्थर’, ‘डॉन’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून जबरदस्त अॅक्शन करणाऱ्या बच्चन यांच्यावर खऱ्या आयुष्यातही असाच एक हल्ला झाल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. कित्येक गुंडांना लोळवणाऱ्या बच्चन यांच्यावर चक्क काही गुंडांनी हल्ला केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००१ च्या फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुद्द अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा खुलासा केला होता. १९९० च्या आसपास बोस्टनमध्ये अमिताभ बच्चन यांची मदत करण्याच्या बहाण्याने काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता आणि त्यांची हातातील ब्रीफकेसदेखील हिसकावली होती. त्यावेळी अमिताभ यांना प्रचंड हताश झाल्यासारखं वाटलं होतं.

आणखी वाचा : ‘पठाण’च्या दिग्दर्शकाबरोबरचा प्रभासचा आगामी चित्रपट झाला डबाबंद; परत करावे लागले ‘एवढे’ कोटी

याविषयी बोलताना बच्चन म्हणाले, “काही वर्षांपूर्वी बोस्टनच्या हॉटेल लॉबीमध्ये काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता. ६ लोकांच्या टोळीने रंग सांडून माझं जॅकेट खराब केलं, नंतर ते जॅकेट स्वच्छ करण्याच्या बहाण्याने त्यांनी माझी ब्रीफकेस हातातून हिसकावली आणि त्यांनी तिथून पळ काढला. त्यात माझी सगळी महत्त्वाची कागदपत्रं होती. माझा पासपोर्ट, पैसे, आई वडील आणि मुलांची पोस्टकार्ड अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. त्याक्षणी मी खूप हताश झालो होतो.”

आणखी वाचा : ‘ये जवानी है दिवानी’च्या सीक्वलबद्दल रणबीर कपूर स्पष्टच म्हणाला, “अयानच्या डोक्यात…”

अमिताभ बच्चन यांचा यावर्षी ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट चांगलाच हीट ठरला. त्यापाठोपाठ आलेला ‘गुडबाय’ या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. यानंतर त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला अन् तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शिवाय त्याला बॉक्स ऑफिसवरही उत्तम यशही मिळाले. याबरोबरच बिग बी हे ‘केबीसी १५’च्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहेत.