दिग्दर्शक अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या मते, लोकांमध्ये त्याच्याबद्दल गैरसमज आहे की तो गांजाचे सेवन करतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याला या सगळ्याची अ‍ॅलर्जी आहे. एका चित्रपट महोत्सवात एका चाहत्याने त्याला गांजाच्या भरलेल्या सिगारेटस्चा बॉक्स भेट म्हणून दिल्याचा किस्साही त्याने आठवला.

‘फ्लिप द स्क्रिप्ट विथ शुब्रा पॉडकास्ट’मध्ये अनुराग म्हणाला, “मी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘रमन राघव’ सिनेमे बनवल्यापासून लोकांना वाटतं की मी मनोरुग्ण आहे. सुरुवातीला मला भेटायलाही लोक खूप घाबरायचे. पण जेव्हा ते मला भेटतात तेव्हा ते भारावून जातात कारण मी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. मी गांजाचे सेवन करतो, असं अनेकांना वाटतं. मला बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं, लोक मला व्यसनाधिन म्हणतात. पण मला त्याची अॅलर्जी आहे हे त्यांना माहीत नाही. माझ्या आजूबाजूला कोणीतरी धुम्रपान करत असल्याचा मला वास येत असला तरी मला दम्याचा अटॅक येतो.”

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Sunil Pal reveals kidnapping details
Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं

प्रसिद्ध अभिनेत्रीने २० वर्षांनी सांगितलं सिनेसृष्टी सोडण्याचं कारण; म्हणाली, “चित्रपटाच्या अभिनेत्याने मला त्याच्या खोलीत…”

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकदा एक चाहता त्याच्याकडे खास भेट घेऊन आला होता. ती घटना आठवत अनुराग म्हणाला, “मी महोत्सवासाठी टोरंटोमध्ये होतो, माझ्याजवळ कोणीतरी आलं आणि म्हणालं, ‘मी तुमच्यासाठी एक छान गिफ्ट आणले आहे.’ त्याच्याकडे फुलांनी गुंडाळलेली पिशवी होती आणि मला त्याची अॅलर्जी असल्यामुळे मी दुरूनच त्याचा वास घेऊ शकतो. मी म्हणालो, ‘त्या पिशवीत काय आहे?’ तो म्हणाला, ‘तुम्हाला आवडेल असं काहीतरी.’ मी बॅग उघडली तेव्हा त्याने त्यात गांजा होता.”

विवाहित असून प्रेमात पडले, काहींनी पहिल्या पत्नीला सोडून लग्नंही केली पण अखेर त्यांच्याकडेच परतले ‘हे’ सेलिब्रिटी

अनुरागने त्या चाहत्याला ताबडतोब तो गांजा तिथून नेण्यास सांगितलं. “मी म्हणालो, ‘तुला काय प्रॉब्लेम आहे? हा गांजा माझ्यापासून दूर ने, हा वास दूर ने. नंतर मला तिथेच अँटीहिस्टामाइन्स घ्यावे लागले. लोकांचे हे गैरसमज खूप वाईट आहेत. पण दुर्दैवाने ते मी बदलू शकत नाही,” असं अनुराग म्हणाला.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

या मुलाखतीत अनुरागने करोना काळात उद्भवलेल्या अनेक आरोग्य समस्यांबद्दल सांगितलं. त्याचा एक प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर व्यावसायिक अडचणींमुळे तो नैराश्यात गेला आणि त्यानंतर त्याला दोनदा हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला स्टेरॉईड्स घ्यावे लागले, परिणामी त्याचे वजन खूप वाढले, असा खुलासा अनुरागने केला.

Story img Loader