दिग्दर्शक अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या मते, लोकांमध्ये त्याच्याबद्दल गैरसमज आहे की तो गांजाचे सेवन करतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याला या सगळ्याची अॅलर्जी आहे. एका चित्रपट महोत्सवात एका चाहत्याने त्याला गांजाच्या भरलेल्या सिगारेटस्चा बॉक्स भेट म्हणून दिल्याचा किस्साही त्याने आठवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘फ्लिप द स्क्रिप्ट विथ शुब्रा पॉडकास्ट’मध्ये अनुराग म्हणाला, “मी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘रमन राघव’ सिनेमे बनवल्यापासून लोकांना वाटतं की मी मनोरुग्ण आहे. सुरुवातीला मला भेटायलाही लोक खूप घाबरायचे. पण जेव्हा ते मला भेटतात तेव्हा ते भारावून जातात कारण मी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. मी गांजाचे सेवन करतो, असं अनेकांना वाटतं. मला बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं, लोक मला व्यसनाधिन म्हणतात. पण मला त्याची अॅलर्जी आहे हे त्यांना माहीत नाही. माझ्या आजूबाजूला कोणीतरी धुम्रपान करत असल्याचा मला वास येत असला तरी मला दम्याचा अटॅक येतो.”
टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकदा एक चाहता त्याच्याकडे खास भेट घेऊन आला होता. ती घटना आठवत अनुराग म्हणाला, “मी महोत्सवासाठी टोरंटोमध्ये होतो, माझ्याजवळ कोणीतरी आलं आणि म्हणालं, ‘मी तुमच्यासाठी एक छान गिफ्ट आणले आहे.’ त्याच्याकडे फुलांनी गुंडाळलेली पिशवी होती आणि मला त्याची अॅलर्जी असल्यामुळे मी दुरूनच त्याचा वास घेऊ शकतो. मी म्हणालो, ‘त्या पिशवीत काय आहे?’ तो म्हणाला, ‘तुम्हाला आवडेल असं काहीतरी.’ मी बॅग उघडली तेव्हा त्याने त्यात गांजा होता.”
अनुरागने त्या चाहत्याला ताबडतोब तो गांजा तिथून नेण्यास सांगितलं. “मी म्हणालो, ‘तुला काय प्रॉब्लेम आहे? हा गांजा माझ्यापासून दूर ने, हा वास दूर ने. नंतर मला तिथेच अँटीहिस्टामाइन्स घ्यावे लागले. लोकांचे हे गैरसमज खूप वाईट आहेत. पण दुर्दैवाने ते मी बदलू शकत नाही,” असं अनुराग म्हणाला.
या मुलाखतीत अनुरागने करोना काळात उद्भवलेल्या अनेक आरोग्य समस्यांबद्दल सांगितलं. त्याचा एक प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर व्यावसायिक अडचणींमुळे तो नैराश्यात गेला आणि त्यानंतर त्याला दोनदा हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याला स्टेरॉईड्स घ्यावे लागले, परिणामी त्याचे वजन खूप वाढले, असा खुलासा अनुरागने केला.