अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिस वर्सेस रिकी बहल’, ‘दिल धडकने दो’ अशा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एकेकाळी या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या, पण सर्व चर्चा अनुष्का शर्माने फेटाळल्या होत्या. अनुष्काने रणवीरला का डेट करत नसल्याचं कारण सिमी गरेवालच्या शोमध्ये सांगितलं होतं. रणवीर व दीपिकाने ‘कॉफी विथ करण’ या शोच्या आठव्या पर्वात हजेरी लावल्यानंतर अनुष्काचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रणवीरबद्दल बोलताना दिसते.

‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

मुलाखतीत तू रणवीरला डेट का करत नाहीस? असं सिमी गरेवाल तिला विचारते. उत्तर देताना अनुष्काने सर्वात आधी रणवीरला डेट करत नसल्याचं स्पष्ट केलं आणि नंतर म्हणाली, “जर तुम्ही रणवीर आणि मला खरंच चांगले ओळखत असाल किंवा जे लोक आम्हाला चांगले ओळखतात, तर त्यांना माहीत आहे की आम्ही खूप वेगळे लोक आहोत.”

अनुष्का पुढे म्हणाली, “आमचं नातं खूप वेगळं आहे. आम्ही एकमेकांना मारू शकतो. मी खरं सांगत आहे, मी त्याचे डोके फोडू शकते, तो माझं डोकं फोडू शकतो. जर आम्हाला कधी रिलेशनशिपमध्ये यावं लागलं तर आम्हाला नात्यापासून वेगवेगळ्या गोष्टी अपेक्षित असतील. आम्ही दोघे आयुष्याला खूप वेगळ्या पद्धतीने बघतो. तो अतिशय प्रॅक्टिकल आहे, मी अजिबात प्रॅक्टिकल नाही.”

“मला तो आवडतो, तो आकर्षक आहे. पण, माझ्यासाठी नातं फालतू असू शकत नाही. त्यामुळे जर मी एखाद्या पुरुषाबरोबर असेल तर त्याने मला शांत करणे आवश्यक आहे. नाहीतर त्या नात्याला काही अर्थ नसेल,” असं अनुष्का या व्हिडीओत म्हणताना दिसते. दरम्यान, अनुष्का व रणवीरबद्दल बोलायचं झाल्यास अनुष्का क्रिकेटपटू विराट कोहलीला डेट करत होती. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली, तर रणवीरने दीपिका पदुकोणशी लग्न केलं.

Story img Loader