आपल्या लाजवाब अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा हरहुन्नरी अभिनेता अर्शद वारसी हा त्याच्या ‘असुर २’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अर्शदने ‘हासिल’, ‘गोलमाल सीरिज’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जॉली एलएलबी’अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. त्याला खरी ओळख ही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या सर्किट या पात्रामुळे मिळाली अन् त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्या भूमिकेमुळे अर्शदला आज ओळख मिळाली त्याच भूमिकेबद्दल तो साशंक होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील भूमिका ही वाईट होती, असं त्याचं म्हणणं होतं, शिवाय यामुळे त्याचं करिअर संपुष्टात येऊ शकेल अशी भीतीही होती. याआधी या भूमिकेसाठी मकरंद देशपांडे यांनाही विचारण्यात आलं होतं. ही भूमिका केवळ राजकुमार हिरानी यांच्यासाठी केल्याचं अर्शदने नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

आणखी वाचा : १४ व्या वर्षी झाला अनाथ, आज आहे कोट्यवधींचा मालक; ‘असुर २’ स्टार अर्शद वारसीची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधतांना याबद्दल अर्शद म्हणाला, “हा चित्रपट केल्यानंतर माझं आयुष्य बरबाद होणार आहे हे मला ठाऊक होतं. मला वाटलं हा चित्रपट माझा शेवटचा चित्रपट ठरेल. या भूमिकेला मकरंद देशपांडेसारख्या कलाकारानेही नकार दिला होता, अशी ही एका गुंडाची भूमिका होती. चित्रपट हिट झाला किंवा फ्लॉप झाला तरी त्यातून मला काहीच मिळणार नव्हतं. संजय दत्तसुद्धा या चित्रपटाच्या बाबतीत तेवढा कॉन्फिडन्स नव्हता.”

पुढे अर्शद म्हणाला, “मला राजकुमार हिरानी आवडतात, एक माणूस म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून. मला कथा आवडलेली, पण या चित्रपटातून मला काही मिळणार नाही हे मला माहीत होतं. कारण आजवरच्या चित्रपटात अशा प्रकारचे गुंड कुणीच पाहिले नव्हते.” या चित्रपटाने केवळ संजय दत्तचं करिअर रुळावर आणलं नाही तर इंडस्ट्रीला अर्शद वारसीसारख्या कलाकाराची वेगळ्या पद्धतीने ओळख करून दिली अन् चित्रपटाने इतिहास रचला. सध्या राजकुमार हिरानी हे शाहरुख खानसह ‘डंकी’ या चित्रपटावर काम करीत आहेत.