सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. या सोहळ्यासाठी हिंदीसह दक्षिणेतील सेलिब्रिटीही जामनगरला पोहोचले आहेत. अनेक गायकही या सोहळ्यात परफॉर्म करत आहेत. याचदरम्यान, आशा भोसले यांनी लतादीदींबद्दल सांगितलेला एक किस्सा चर्चेत आला आहे. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांना लग्नात गाण्यासाठी लाखो डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी नकार दिला होता. दिग्गज गायिका व लतादीदींच्या बहीण आशा भोसले यांनी एकदा याबाबत खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डीआयडी लिटील मास्टर्स ५ या डान्स रिॲलिटी शोमध्ये आशा म्हणाल्या होत्या, “त्यांना (लता मंगेशकर यांना) एका लग्नात गाण्यासाठी एक मिलियन डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती. ‘तुमचे फक्त दोन तास द्या आणि या आणि लग्नाला उपस्थित राहा’ पण लतादीदींनी उत्तर दिलं होतं, ‘तुम्ही मला ५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही,” असं आशा भोसलेंनी सांगितलं होतं.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात आशा भोसले यांनी असाच एक किस्सा सांगितला होता. “आम्हाला कोणीतरी लग्नासाठी बोलावलं होतं. त्यांच्याकडे दशलक्ष डॉलर्स किंवा पौंड किमतीची तिकिटं होती. त्यांना आशा भोसले आणि लता मंगेशकर हव्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. दीदींनी मला विचारलं, ‘तू लग्नात गाणार का?’ मी म्हणाले, मी गाणार नाही, आणि दीदींना त्या प्रतिनिधीला सांगितलं, ‘तुम्ही १० कोटी डॉलर्स दिले तरी आम्ही गाणार नाही, कारण आम्ही लग्नात गात नाही.’ हे एकून ती व्यक्ती खूप निराश झाली होती,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

Video : बॉलीवूडचे तीन खान आले एकत्र! अनंत अंबानींच्या प्रे-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख व आमिरचा डान्स; गाणं होतं खूपच खास

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नासाठी लता मंगेशकर यांनी गायत्री मंत्र आणि गणेश स्तुती रेकॉर्ड केली होती. तसेच या जोडप्यासाठी खास मेसेज पाठवला होता. लतादीदींचे रेकॉर्डिंग गुजराती आणि हिंदू वैदिक विधी दरम्यान वाजण्यात आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When asha bhosle revealed lata mangeshkar refused to sing in wedding function hrc