‘टारझन: द वंडर कार’ आणि ‘वॉन्टेड’ यांसारख्या चित्रपटातून लोकांची मनं जिंकणारी आयशा टाकियाचा आज वाढदिवस. आज आयशा तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयशा टाकियाच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची जास्त चर्चा झाली. राजकीय परिवाराशी जोडलेली सोयरीक, इस्लाम कबूल करून चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणे, प्लॅस्टिक सर्जरी यामुळे आयशा बऱ्याचदा चर्चेत आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयशाने जेव्हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्या मुलाशी लग्न केले अन् इस्लाम कबूल केला तेव्हा मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ माजली होती. आयशाला एकेकाळी आपल्या सासऱ्यांच्या वादग्रस्त विधानामुळे जनतेचा रोष पत्करावा लागला होता. अबू आझमी यांच्या एका वक्तव्यामुळे आयशावर लोकांनी चांगलीच टीका केली होती. तिला यासाठी जाहीरपणे माफीदेखील मागावी लागली होती.

आणखी वाचा : व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर नयनतारा भडकली; अभिनेत्रीने दिली फोन तोडायची धमकी

काय म्हणाले होते अबू आझमी?

२०१४ मध्ये अबू आझमी यांनी बलात्कार आणि त्यावरून होणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेबद्दल फार असंवेदनशील वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला देशभारातून विरोध झाला होता. अबू आझमी म्हणाले होते, “इस्लामनुसार, बलात्कार दंडनीय अपराध आहे… कोणतीही स्त्री, मग ती विवाहित असो किंवा अविवाहित, एखाद्या पुरुषाबरोबर तिच्या संमतीने किंवा त्याशिवाय लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्या दोघांनाही फाशी द्यावी. एखादी स्त्री संमतीने गेली तरीही त्याची परवा करता कामा नये.” या वक्तव्याबरोबरच बलात्कारासारख्या अपराधाला छोटीशी चूक म्हणत अबू यांनी भाष्य केलं होतं. “मुलांकडून अशा चुका होत असतात, म्हणून काय त्यावर थेट फाशी हा उपाय आहे का?” असं भाष्य अबू आझमी यांनी केलं होतं.

आणखी वाचा : “त्याची काय लायकी…” उर्फी जावेदच्या फॅशनबद्दल भाष्य करणाऱ्या रणबीर कपूरला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

अबू यांच्या या वक्तव्यावर आयशाने केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. आपल्या सासऱ्यांच्या अशा असंवेदनशील वक्तव्यामुळे आयशाला फार वाईट वाटलं होतं. याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत ती म्हणाली, “माझ्या सासऱ्यांनी केलेलं हे वक्तव्य जर खरं असेल तर मी आणि फरहान आम्हाला फारच लज्जास्पद वाटत आहे. आम्ही अशा मानसिकेतचा विरोधच करतो. एक महिला म्हणून याकडे पाहताना मला फार लाजिरवाणं वाटतं आहे.”

२०१७ मध्ये पुन्हा अबू आझमी यांनी महिलांविरोधात केलेल्या एका वक्तव्यामुळे आयशा चर्चेत आली होती. या वक्तव्यात अबू आझमी यांनी महिलांची तुलना साखर आणि पेट्रोलशी केलेली. आयशाने अल्पावधीत इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत चांगले नाव कमावले होते, पण तितक्याच कमी वेळात ती इंडस्ट्रीतून गायब झाली. २००९ मध्ये फरहानशी लग्न केल्यानंतर तिने करिअर सोडलं आणि वैवाहिक आयुष्यात रमली. आयशा व फरहानला मिकेल नावाचा मुलगा आहे. दोघेही मुलाबरोबर आनंदाने जगत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When ayesha takia was embarrassed because of her father in law controversial statement avn
Show comments