शाहरुख खान, सुनील शेट्टी, चंकी पांडे या अभिनेत्यांनी नव्वदच्या दशकात एकामागोमाग एक असे सुपरहिट चित्रपट दिले होते. आता याच स्टार्सची मुलं बॉलिवूडमध्ये आपले करत आहेत. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे कायमच चर्चेत असते. अनन्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु तिने काम केलेला एकही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. वडील दिग्गज अभिनेते असूनदेखील आणण्याला आपली छाप पाडता आली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंकी पांडेला मात्र आपल्या मुलीकडून खूप अपेक्षा आहेत. त्याने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ‘आम्ही ८०, ९० च्या दशकात अनेक सार्वजनिक कार्यक्रम करायचो तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला समोर कळायच्या. आता सगळेच टीकाकार झाले आहेत. मला आता त्याची सवय झाली आहे आणि मी माझ्या मुलीला (अनन्या) तेच शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलिवूडमध्ये काम करणे हा वेगळ्या प्रकारचा खेळ आहे. माझी पत्नी भावना हिने तिचे चांगले पालनपोषण केले आहे आणि एखाद्या उत्तम कर्मचाऱ्यांप्रमाणे ती तयार होईल’.

Photos : कधी रोमँटिक, कधी नकारात्मक, बॉलिवूडच्या हे अभिनेते झळकलेत हटके भूमिकेत

अनन्याच्या वाढदिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या. तिची आई भावना पांडेने पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर करीना कपूर खाननेदेखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका अरोराने तिच्याबरोबरचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘लाइगर’ च्या अपयशानंतर अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. तसेच झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे. सध्या ती अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When chunky panday said bhavana had brought up ananya panday well and she will be good employee spg