बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी हे दोघेही १९८० मध्ये विवाहबंधनात अडकले. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्म बदलून दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १९८१ मध्ये धर्मेंद्र आणि हेमा यांनी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. दोघांनाही पहिली मुलगी झाली, तिचे नाव ईशा असे ठेवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : केदार शिंदेंचे ७ अंकाबरोबर आहे खास कनेक्शन; ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर खुलासा करत म्हणाले…

हेमा यांनी त्यांच्या गरोदरपणाबद्दल कोणालाही कल्पना दिली नव्हती. ईशाला जन्म देण्यापूर्वी जेव्हा त्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या, तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली होती. आपल्या बायकोला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊ नये, तिला शांती मिळावी म्हणून धर्मेंद्र यांनी संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते.

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या “रॉकी और रानी…”च्या ट्रेलरमध्ये दिसली ‘या’ स्टारकिडची झलक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

‘जीना इसी का नाम है’ या टीव्ही शोमध्ये हेमा मालिनी यांची जवळची मैत्रीण नीतू कोहली यांनी हजेरी लावली होती. यावेळी नीतू कोहली म्हणाल्या, “हेमा मालिनी गरोदर होत्या हे कोणालाही माहिती नव्हते. ईशाच्या जन्मापूर्वी धर्मेंद्र यांनी संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते. त्या हॉस्पिटलमध्ये तब्बल १०० खोल्या होत्या. त्या सगळ्या १०० खोल्या धर्मेंद्र यांनी बुक केल्या होत्या. ईशाचा जन्म २ नोव्हेंबर १९८१ मध्ये झाला.”

हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान पोहोचली गोव्यात, ‘त्या’ व्यक्तीसह फोटो शेअर केल्यामुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण

राज कमल मुखर्जी यांच्या ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात अभिनेत्रीनी खुलासा केला होता की, “धर्मेंद्र यांची आई आणि त्यांची सासू सतवंत कौर या ईशाला जन्म देण्यापूर्वी त्यांना जुहूमधील डबिंग स्टुडिओमध्ये भेटायला आल्या होत्या. याबाबत त्यांनी सतवंत परिवारामध्ये कोणासही कल्पना दिली नव्हती. त्यांच्या पाया पडल्यावर त्यांनी मला तू कायम आनंदी राहा असा आशीर्वाद दिला होता.” असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

हेही वाचा : 72 Hoorain चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल; मुस्लीम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप

दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० साली लग्नगाठ बांधली. मात्र, हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचे १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, दोन मुली अजिता आणि विजेता देओल अशी चार अपत्य आहेत. तसेच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. या दोघींचेही विवाह २०१२ आणि २०१४ मध्ये संपन्न झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When dharmendra booked entire hospital for hema malini as she gave birth to esha deol sva 00