गेल्या काही दिवसांपारसून हेमा मालिनी व धर्मेंद्र यांचं नाव बरंच चर्चेत आलं आहे. सनी देओलचा मुलगा करणच्या लग्नामुळे देओल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या विवाहसोहळ्याला हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली गैरहरज होत्या. यावरुनच अनेक चर्चांना उधाणही आले.
हेही वाचा- निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’चे 3D तिकिट दर केले कमी; ऑफर पाहून नेटकरी म्हणाले, “ही भीक मागायची…”
हेमा मालिनी यांनी लग्नानंतर धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबापासून अंतर ठेवले आहे. या मागच्या कारणांचा खुलासाही अभिनेत्रीने अनेकदा केला आहे. हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता. हेमा मालिनी धर्मेंद्र यांची आई सतवंत कौर यांना पहिल्यांदा भेटल्या होत्या. त्यावेळेस त्या गरोदर होत्या. त्यांच्या पोटात ईशा होती. हेमा मालिनी यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये या भेटीचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- कार्तिक आर्यनचा इकोनॉमी क्लासमधून विमान प्रवास; अभिनेत्याला बघून प्रवासी झाले चकित
हेमा मालिनी यांनी आपले चरित्र ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’मध्ये सांगितले की, ‘धरमजींची आई तितकीच दयाळू होती. मला आठवतंय जेव्हा मी गरोदर होते आणि ईशाचा जन्म होणार होता. तेव्हा त्या जुहूच्या डबिंग स्टुडिओत मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी घरात कोणालाच याबाबत काही सांगितले नव्हते. मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाल्या, बेटा नेहमी आनंदी राहा. त्या माझ्यावर खूश होत्या याचा मला आनंद आहे.”
हेमा मालिनींनी आपल्या चरित्रात असेही म्हटले आहे की, “मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले त्यात मी आनंदी आहे. इतर वडिलांप्रमाणेच त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. मी यातच आनंदी आहे”
हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या नात्याच्या त्याकाळी बऱ्याच चर्चा रंगत होत्या. धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न केले. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, विजेता व अजेता अशी चार मुलं आहेत. या चार मुलांनंतर त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रकाश कौर यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचं अजूनही चांगलं नातं आहे. करण देओलच्या लग्नामध्ये दोघांचं एकत्रित फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं आहे.