डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची चांगली मैत्रीही आहे. पण डिंपल यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांना किळसवाणे आणि आपली नकारात्मक बाजू लपवून ठेवणारे म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली होती.

डिंपल आणि नाना पाटेकर यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी एकमेकांबरोबर काम केलं नव्हतं. अखेर २०१० मध्ये ‘तुम मिलो तो सही’ या चित्रपटात पुन्हा एकदा त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. ‘एनडीटीव्ही’च्या एका मुलाखतीत डिंपल यांना नाना पाटेकर यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला होता. त्याच्या उत्तरात डिंपल नानांबद्दल असं काही बोलून गेल्या की ज्याची खूप चर्चा झाली होती.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

हेही वाचा – सनी देओलमुळे राजेश खन्ना यांना घटस्फोट न देता २७ वर्षे वेगळ्या राहिलेल्या डिंपल कपाडिया?

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, “मला नाना किळसवाणे वाटतात,” असं डिंपल नानांबद्दल म्हणाल्या होत्या. त्यांच्याबद्दल चांगलं आणि वाईट काय असं विचारल्यावर डिंपल म्हणाल्या, “चांगल्या मार्गाने आणि वाईट दोन्ही मार्गाने. ते खूप प्रतिभावान आहेत, यात मला तिळमात्र शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते.”

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

पुढे डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या नकारात्मक बाजूवर प्रकाश टाकला. “एक व्यक्ती म्हणून माझ्यासोबत नाना खूप चांगले वागतात, आम्ही दोघे चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची भयंकर बाजूही पाहिली आहे. त्यांची नकारात्मक बाजू. आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लवपून ठेवतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवली आहे,” असं डिंपल यांनी म्हटलं होतं.

डिंपल कपाडिया नुकत्याच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रटात आणि ‘सास बहू और फ्लेमिंगो’ या वेब सीरिजमध्ये झळकल्या होत्या. सध्या त्या त्यांच्या इतर चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहेत.

Story img Loader