बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाने चित्रपटसृष्टीत अल्पावधीतच अभिनयाच्या जोरावर स्वत: वेगळं स्थान निर्माण केलं. दीपिकाचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहे. बॉलिवूडच्या मस्तानीची भूरळ एलॉन मस्कलाही पडली होती.
दीपिकाने एक सो एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. तिने साकारलेल्या भूमिकांचं कौतुकही झालं होतं. असाच एक चित्रपट म्हणजे ‘बाजीराव मस्तानी’. या चित्रपटात दीपिकाने मस्तानीची भूमिका साकारली होती. तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पेशवा बाजीराव यांच्या भूमिकेत होता. चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनीही प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील ‘मस्तानी’ हे गाणं एलॉन मस्कच्याही पसंतीस उतरलं होतं.
हेही वाचा >> Video : राज ठाकरेंनी ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी असा रेकॉर्ड केला आवाज, मेकिंग व्हिडीओ पाहिलात का?
२०१८ साली एलॉन मस्कने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या गाण्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. मस्तानी गाण्याची युट्यूब लिंक पोस्ट करत त्याबरोबर रणबीर सिंगचा मल्हारी गाण्यातील जीआयएफ त्यांनी शेअर केला होता. ‘बाजीराव मस्तानी’ असं कॅप्शनमध्ये लिहून पिवळ्या रंगाचे हार्ट इमोजी त्याने पोस्ट केले होते. एलॉन मस्कचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं होतं. या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या होत्या.
हेही वाचा >> “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप
हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा
एलॉन मस्कचं हे ट्वीट रणवीर सिंगने लाइक केलं होतं. तर दीपिकाने हे ट्वीट रिट्वीट करत हात जोडण्याचे इमोजी पोस्ट केले होते. आता एलॉन मस्क ट्वीटरचा मालक झाल्यानंतर पुन्हा एकदा या ट्वीटची चर्चा रंगली आहे. संजय लीला भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रियांका चोप्राने काशीबाईंची भूमिका साकारली होती.