बॉलिवूडवर एक काळ राज्य करणाऱ्या गोविंदाचा आज वाढदिवस. आज गोविंदा त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. विनोदाचं टायमिंग, अफलातून नृत्यकौशल्य, या जोरावर गोविंदाने एक काळ गाजवला होता. आजही गोविंदाचा एक मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चित्रपट आजही मन लावून पाहणारे त्याचे चाहते मात्र त्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच नाराज झाले होते. ते वक्तव्य म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’ चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य.

रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात गोविंदाने ‘अवतार’ हा चित्रपट नाकारल्याचा दावा केला होता. इतकंच नाही तर या चित्रपटाला ‘अवतार’ हे नावसुद्धा गोविंदानेच सुचवलं होतं असाही त्याने दावा केला होता. गोविंदाच्या या व्यक्तव्यामुळे तेव्हा तो चांगलाच ट्रॉल झाला होता.

आणखी वाचा : ३९व्या वर्षी गौहर खान होणार आई, खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

मुलाखतीत गोविंदा म्हणाला, “अवतार हे नाव मी त्यांना दिलं, शिवाय हा चित्रपट सुपरहीट होणार हेदेखील मीच त्यांना सांगितलं. हा चित्रपट बनायला ७ वर्षं लागतील असंही मी सांगितलं. बरोबर ८ व्या वर्षी चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहीट ठरला, मला यासाठी विचारण्यात आलं होतं, पण तब्बल ४०० दिवसांपेक्षा जास्त काळ त्यासाठी लागणार होता, आणि संपूर्ण शरीरावर ते निळा रंग देणार होते, मला ते काही जमणार नव्हतं त्यामुळे मी या चित्रपटाला नकार दिला होता.”

नुकताच ‘अवतार २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच निमित्ताने गोविंदाचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला जात आहे. या मुलाखतीनंतर गोविंदा चांगलाच ट्रोल झाला होता. लोकांनी त्याला अक्षरशः वेड्यात काढलं होतं. यावरून नंतर बरेच वाद प्रतिवादही झाले, पण गोविंदाचं ते वक्तव्य प्रेक्षकांना चांगलंच खटकलं होतं. आतासुद्धा लोक सोशल मीडियावर याविषयी धमाल मीम्स शेअर करत आहेत.

Story img Loader