Abhishek Bachchan Aishwarya Rai Wedding : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. दोघेही अनंत अंबानी -राधिका मर्चंटच्या लग्नात वेगवेगळे आले होते. त्यानंतर ऐश्वर्या फक्त मुलीबरोबरच न्यूयॉर्कला फिरायला गेली होती. तेव्हापासून या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न १७ वर्षांपूर्वी झालं. या दोघांच्या लग्नातही मोठा गोंधळ झाला होता. महानायक अमिताभ बच्चन व दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचा एकुलता एक मुलगा असूनही अभिषेक बच्चनचा लग्नसोहळा खूपच खासगी ठेवण्यात आला होता. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांचं लग्न झालं, त्यादिवशी हे लग्न होऊ नये यासाठी जान्हवी कपूरने तिच्या हाताची नस कापली होती.
“विराट कोहली उत्तम अभिनेता, पण त्याने चित्रपटांमध्ये येऊ नये; निवृत्तीनंतरही नाही”
अभिषेक बच्चनसाठी हाताची नस कापणाही ही जान्हवी कपूर बोनी कपूर यांची लेक व अभिनेत्री जान्हवी नव्हे. तर ती एक मॉडेल होती, तिने आपलं अभिषेकशी लग्न झालंय असा दावा केला होता. जान्हवी कपूर (Model Janhavi Kapoor) नावाच्या एका मॉडेलने दावा केला होता की अभिषेक बच्चनने २००६ मध्ये तिच्याशी गुपचूप लग्न केलं होतं. जान्हवीने अभिषेकविरोधात एफआयआर दाखल केला होता, पण तिच्याकडे लग्नाचा कोणताही पुरावा नव्हता, तसेच लग्नाचे कोणी साक्षीदार नव्हता. त्यामुळे पोलिसांनीही अभिषेकवर कोणतीही कारवाई केली नाही.
जान्हवीने अभिषेक व ऐश्वर्याचे लग्न मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती तसं करू शकली नाही. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच आपल्या हाताची नस कापली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यावेळी जान्हवीने बराच गोंधळ घातला होता. ‘सियासत डेली’ने हे वृत्त दिलं आहे.
सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या लग्नासाठी फार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. या दोघांच्या लग्नाला बच्चन कुटुंबातील जवळचे लोक, ऐश्वर्याचे कुटुंबीय व काही जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांचं लग्न इतक्या साधेपणाने खासगी का पार पडलं, याबाबत बच्चन कुटुंबाने सांगितलं होतं. अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन त्या वेळी आजारी होत्या, त्यामुळे हे लग्न साधेपणाने पार पडले, असा खुलासा बच्चन कुटुंबाकडून करण्यात आला होता. अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानंतर काही महिन्यांनी तेजी बच्चन यांचे निधन झाले होते.