Jaya Bachchan-Aishwarya Rai : ज्येष्ठ अभिनेत्री व राज्यसभेच्या खासदार जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्या अनेक विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. मागच्या बऱ्याच काळापासून अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. अशातच सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दल जया बच्चन यांनी केलेल्या एक वक्तव्याने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जया बच्चन यांनी एकदा एका मुलाखतीत ऐश्वर्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. यावेळी त्यांनी मुलगी व सून यातला फरक सांगितला होता. जया बच्चन यांनी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्याशी बोलताना आपल्या सासू या भूमिकेबद्दल चर्चा केली होती.

उंदराचा चावा अन् शौचालयाची लांब रांग; जॅकी श्रॉफ यांनी चाळीतील आठवणींना दिला उजाळा, म्हणाले, “मला अजुनही…”

ती माझी मुलगी नाही – जया बच्चन

अभिषेक बच्चनशी ऐश्वर्या रायचं लग्न झाल्यानंतर सासू म्हणून तुम्ही कडक वागता का? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला होता. त्यावर प्रतिप्रश्न करत जया बच्चन “कडक? ती माझी मुलगी नाही! ती माझी सून आहे. मी तिच्याशी कडक किंवा कठोरपणे का वागावं? मला खात्री आहे की तिची आई असं वागली असेल,” असं म्हणाल्या होत्या.

“मी धूममध्ये किसिंग सीन केला तेव्हा…”, ऐश्वर्या रायने हृतिक रोशनबरोबरच्या सीनवर दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुलगी व सून यात फरक असतो असं जया बच्चन यांनी म्हटलं होतं. “मुलगी आणि सून यात फरक असतो. म्हणजे मला माहीत नाही का, पण तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा आदर करण्याची गरज नाही असं वाटतं. मुलगी म्हणून तुम्ही तुमच्या आई-वडिलांना गृहीत धरता. पण तुम्ही सासरच्या मंडळींबरोबर हे करू शकत नाही,” असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. मुलगी व सूनेतला हा मुख्य फरक त्यांनी सांगितला होता. तसेच हा फरक प्रत्येक कौटुंबिक भूमिकेसह येणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या दर्शवतो, असं मतही त्यांनी मांडलं होतं.

Jaya Bachchan with Aishwarya Rai
जया बच्चन व ऐश्वर्या राय (फोटो – इन्स्टाग्राम)

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर, लेक आराध्याचीही दिसली झलक

लग्नानंतर कालांतराने हळूहळू गोष्टी बदलतात, असं जया यांनी कबूल केलं होतं. “नंतर गोष्टी बदलतात, कारण आज मला मी भादुरीपेक्षा बच्चन जास्त आहे, असं वाटतं,” असं त्या म्हणाल्या होत्या.

ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांचे लग्न २००७ मध्ये झाले, त्यांच्या वैवाहिक जीवनाची १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडप्याला एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या असून ती १२ वर्षांची आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत, पण याबाबत त्या दोघांनी किंवा बच्चन कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.