अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेम प्रकरणाइतकेच चर्चेत राहिले होते. या जोडप्याच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. रेखा यांनी अनेकवेळा अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं आहे. पण अमिताभ बच्चन मात्र याबद्दल कधीच बोलले नाही. रेखा व जया दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीत राहायच्या. जया अमिताभ यांना डेट करत होत्या, तेव्हाच रेखा अमिताभ यांना भेटल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखा यांच्यामुळे नात्यात अनेक अडचणी आल्याने अमिताभ यांनी त्यांच्याबरोबर काम करणं बंद केलं, असं म्हटलं जातं. यातलं खरं काय, खोटं काय ते कुणालाच ठाऊक नाही. पण एका मुलाखतीत जया म्हणाल्या होत्या की त्या अमिताभ बच्चन यांची प्रायोरिटी नाही.

सिमी गरेवालच्या शोमध्ये जया बच्चन पती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आल्या होत्या. त्यावेळी अमिताभ यांना पती म्हणून १० पैकी किती गुण द्याल? असं जया यांना विचारण्यात आलं होतं. बिग बींनी स्वत: ७ तर जया बच्चन यांनी ५ गुण दिले होते. जया यांना अमिताभ रोमँटिक आहेत का असं विचारल्यावर जया बच्चन यांनी नकार दिला होता.

मला सवय झाली आहे, असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन?

“माझ्याबरोबर तर नाही. मला आनंद आहे की मला याची सवय झाली आहे, मी खूश आहे,” असं जया बच्चन म्हणाल्या. “तुम्ही माझं मत विचाराल तर अमित यांची पहिली प्राथमिकता त्यांचे आई-वडील, नंतर मुलं आणि नंतर मी आहे. नाही प्रोफेशन, नंतर मी किंवा कदाचित कोणीतरी दुसरं असेल,” असं म्हणून जया हसायला लागल्या. “मेकअप आर्टिस्ट किंवा कार…” असं त्यांनी नमूद केलं होतं.

अमिताभ बच्चन-जया बच्चन (फोटो – श्वेता बच्चन)

ही मुलाखत बरीच जुनी आहे. या मुलाखतीत जया यांनी आणखी एक गोष्ट सांगितली जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जया म्हणाल्या होत्या की अमिताभ रोमँटिक नाहीत, जेव्हा त्यांना रोमँटिक म्हणजे काय? असं विचारलं होतं. जया म्हणाल्या, वाइन आणि फुलं आणणं. जेव्हा बिग बींनी विचारलं की त्यांनी हे कधीच केलं नाही का? तेव्हा जया उत्तर देत म्हणाल्या, “कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर त्यांनी हे केलं असते, परंतु माझ्याबरोबर तर केलं नाही.”