‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दिग्दर्शक करण जोहर सध्या चांगलाच चर्चेत आहे. यानंतर करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’सारखा बिग बजेट मेगा स्टार कास्ट असलेला चित्रपट सादर केला. त्यावेळी करण त्याच्या या चित्रपटाबाबत खूप उत्सुक होता व या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा होत्या, पण जेव्हा करणने ‘लगान’ व ‘दिल चाहता है’ हे चित्रपट पहिले तेव्हा मात्र स्वतःवर असलेला त्याचा विश्वास थोडा डगमगल्याचं त्याने मान्य केलं.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान करण जोहरने या गोष्टीचा खुलासा केला. जावेद अख्तर व हनी इराणी यांचा मुलगा फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ या गाजलेल्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट भारतीय चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरला. पण या चित्रपटाबाबत करण जोहर साशंक होता आणि याला मिळालेला प्रतिसाद पाहून तर तो हैराणच झाला होता.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे ‘कुछ कुछ होता है’च्या प्रदर्शनाच्या दिवशी करण जोहरला देशाबाहेर जावं लागलं होतं

करण म्हणाला, “ते वर्षं माझ्यासाठी फारच कठीण होतं, जेव्हा तुम्ही हवेत उडत असता तेव्हा तुमची नियती तुम्हाला बरोबर ताळ्यावर आणते अन् तुम्हाला तुमची जागा दाखवते. त्या वर्षी आजवरचा सर्वात मोठा व सुपरहीट चित्रपट देण्याचा माझा गैरसमज दूर झाला. जेव्हा मी ‘लगान’ पाहिला अन् चित्रपटगृहांचं स्टेडियममध्ये झालेलं रूपांतर पाहून अवाक झालो, त्यानंतर मी ‘गदर’ पाहिला अन् त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा होता. याबरोबरच त्यावर्षी आलेला ‘चाँदनी बार’सुद्धा पाहिला अन् फारच अस्वस्थ झालो.”

पुढे फरहान अख्तरच्या चित्रपटाचा उल्लेख करताना करण म्हणाला, “त्याचदरम्यान मी ‘दिल चाहता है’सुद्धा पाहिला. मी फरहानबरोबरच लहानाचा मोठा झालो. फरहान अत्यंत खोडकर आणि खट्याळ होता, त्यावेळी मला असं वाटायचं की हा कुठे एवढा चांगला चित्रपट बनवणार?” परंतु फरहानच्या चित्रपटाने करणच्या मनातील गैरसमज दूर केले. त्यावेळी जरी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक व्यवसाय केला असला तरी समीक्षकांचं व प्रेक्षकांचं पारडं ‘लगान’ व ‘दिल चाहता है’च्याच बाजूने झुकलं होतं.

Story img Loader