अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. नुकतीच करिश्मा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर एकत्र डिनर डेटवर गेल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

यामुळे आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा रंगताना दिसत आहे. करिश्मा आणि संजय यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घ्यायचं ठरवलं. त्यावेळी या दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली. दोन्ही बाजूकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. करिश्माने तिच्या सासरकडच्या लोकांवर हुंडा आणि मानसिक छळ यासारखे गंभीर आरोप केले होते.

इतकंच नव्हे तर याचिकेमध्ये करिश्माने सांगितलं की, “संजयचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. ते दोघेही तेव्हा लीव्ह-इनमध्ये रहात होते.” इतकंच नव्हे तर त्यांच्या हनीमुनच्या दिवशी संजयने करिश्माला त्याच्या इतर मित्रांबरोबर रात्र घालवण्यास बळजबरी केली होती. ‘ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार करिश्माने तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत या अशा धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता.

आणखी वाचा : “भाजपा आता शाहरुखचे चित्रपट…” संसद भवनाच्या समर्थनार्थ किंग खानच्या ट्वीटबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते स्पष्टच बोलले

जेव्हा करिश्माने यासाठी नकार दिला तेव्हा संजयने तिला बेदम मारल्याचंही तिने यात स्पष्ट केलं होतं. करिश्माने केवळ पैशांसाठी आपल्याशी लग्न केले आहे हे संजय कपूरचे म्हणणे होते. करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि नंतर मात्र हे लग्न अतिशय विचित्र वळणावर येऊन मोडले.

करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “सगळ्यांना आमची परिस्थिती ठाऊक आहे, आम्ही कपूर आहोत आम्हाला कोणाच्याही पैशाचा मागे धावायची अजिबात गरज नाही. उलट आमच्या घरात पैशाबरोबर उत्कृष्ट कलाही आहे ज्यामुळे आम्ही आमचं पोट भरू शकतो. संजय कपूर हा अतिशय वाईट माणूस आहे, करिश्माने त्याच्याशी लग्न करावं असं मला मुळीच वाटत नव्हतं. साऱ्या दिल्लीला माहीत आहे की ही व्यक्ती कशी आहे, त्यामुळे त्याबद्दल मी आणखी काही बोलणं योग्य नाही.”

संजय कपूरने करिश्मानंतर प्रिया सचदेवाशी लग्न केलं. करिश्माने मात्र नंतर लग्न केलं नाही, आता ती तिच्या ‘मर्डर मुबारक’ या आगामी चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणार आहे. यात करिश्मासह विजय वर्मा, डिंपल कपाडिया, सारा अली खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Story img Loader