बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची आई व प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली होती. नीतू कपूर यांनी एक फोटो शेअर करत रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडवर भाष्य केलं होतं. त्यांच्या या पोस्टचा संबंध रणबीरची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या कतरीना कैफ व दीपिका पदुकोणबरोबर जोडला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीतू कपूर यांच्या पोस्टनंतर कतरिनाच्या आईनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं होतं. आता कतरिना कैफचा एका मुलाखतीदरम्यानचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २०१५ साली इंडिया टुडे कॉनक्लेव्हला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाला “रणबीरची आई नीतू कपूर यांना तू आवडत नाहीस, अशी अफवा आहे,” असा प्रश्न विचारण्यात आला होता. मुलाखतीत हा प्रश्न विचारल्यानंतर कतरिना आश्चर्यचकीत झाली होता.

हेही वाचा>> आधी नीतू कपूरनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सना लगावला टोला; आता कतरिनाच्या आईने दिलं उत्तर? पोस्ट चर्चेत

नीतू कपूर यांच्याबाबत विचारलेल्या या प्रश्नावर कतरिनाने “या अफवांसाठी मीच जबाबदार आहे. मागील आठ-नऊ वर्षांपासून मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे भाष्य केलेलं नाही. मी एक भावनिक स्त्री आहे. प्रेमबाबत गोष्टींवर विश्वास ठेवणं, त्या स्वीकारणं मला अनेकदा कठीण जातं. रणबीरची आई नीतू कपूर व माझ्या नात्याबाबत बोलायचं झालं तर, त्या एक चांगल्या महिला आहेत. रणबीरच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तीना मी भेटले आहे. त्याच्या वडिलांनाही मी भेटले आहे. ते खूप प्रेमळ आहेत,” असं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा>> “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले, “मला…”

नीतू कपूर काय म्हणाल्या होत्या?

“त्याने तुम्हाला सात वर्षे डेट केलं, याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असं नाही. माझे काका सहा वर्षे वैद्यकशास्त्र शिकले, पण आता ते डीजे आहेत,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली होती. त्यानंतर कतरिना कैफची आई सुझान यांनी “मला अशी शिकवण देण्यात आली की तुम्ही कंपनीच्या सीईओला जितका आदर देता तितकाच आदर सफाई कर्मचार्‍यांना द्या.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When katrina kaif asked rumor about ranbir kapoor mother neetu kapoor doesnt like her in interview old video viral kak