बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेला ‘ऊंचाई’ या चित्रपटात अनुपम खेर यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अनुपम खेर यांच्यासह नीना गुप्ता, बोमन इराणी यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अनुपम खेर यांनी किशोर कुमार यांच्यासह घडलेला एक किस्सा सांगितला.

अनुपम खेर यांनी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पहिली भेट कशी झाली, तो प्रसंगही शोमध्ये सांगितला. ते म्हणाले, “’मेहबूब’ या वांद्रे येथील स्टुडिओपासून काहीच अंतरावर माझं घर होतं. त्यामुळे मी चालतच जायचो. पण ‘सारांश’ चित्रपटानंतर पायी चालत जाणं थोडं विचित्र वाटेल, त्यामुळे मी टॅक्सीने जायला लागलो. माझ्या घरापासून टॅक्सी पकडून मी वांद्रा रेल्वे स्टेशनपर्यंत जायचो. तिथून मग काहीतरी विसरल्याचं नाटक करत मी परत टॅक्सी घेऊन ‘मेहबूब’ स्टुडीओजवळ यायचो. मी रोज असं करायचो”.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

हेही वाचा >> Drishyam 2 Box Office Collection: ‘दृश्यम २’ ठरला ‘ब्रह्मास्त्र’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

“एक धोतर घातलेली व्यक्ती रोज माझ्या टॅक्सीचा पाठलाग करत आहे, हे मला जाणवलं. त्याने मला टॅक्सीतून खाली उतरवलं. जेणेकरुन त्यांना टॅक्सीमध्ये बसता येईल. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून किशोर कुमार होते. अशाप्रकारे माझी व त्यांची पहिली भेट झाली”, असं अनुपम खेर यांनी सांगितलं. इतरांप्रमाणेच अनुपम खेरही किशोर कुमार यांचे चाहते होते आणि नंतर एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांची भेट झाली, तेव्हाचा किस्साही त्यांनी शेअर केला.

हेही वाचा >> “१५ वर्षीय मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श…” सुश्मिता सेनने सांगितला ‘तो’ प्रसंग

अनुपम यांना किशोर कुमार यांनी गायलेलं ‘जिंदगी की यही रीत है’ हे गाणं प्रचंड आवडायचं. हे गाणं त्यांना किशोर कुमार यांना लाइव्ह गाताना पाहायचं होतं. एका कॉन्सर्टमध्ये किशोर कुमार यांना ‘जिंदगी की यही रीत है’ हे गाणं लाइव्ह गाताना पाहण्याचा योग जुळून आला. परंतु, किशोर कुमार वेगळ्या सुरात ते गाणं गात असल्याचं त्यांना जाणवलं. अनुपम खेर यांनी किशोर कुमार यांनी तुम्ही चुकीचं गात आहात, असं सांगितलं.

हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

अनुपम खेर यांचे हे शब्द ऐकताच किशोर कुमार यांच्याबरोबर असलेल्या अन्य गायकांनी काही म्हणायच्या अगोदरच त्यांनी अनुपम खेर यांना उत्तर दिलं. त्यांनी विचारलं “हे गाणं कोणी गायलं आहे?”. अनुपम यांनी “तुम्ही” असं उत्तर दिल्यावर ते “आता कोण गात आहे?” असं पुन्हा विचारू लागले. तेव्हा अनुपम खेर यांनी “तुम्हीच गात आहात” असं उत्तर दिलं. त्यावर किशोर कुमार अनुपम यांना म्हणाले “मग तुझ्या बापाचं काय जातंय”. अनुपम खेर यांनी किशोर कुमार यांच्याबरोबर घडलेला हा किस्सा सांगताच कार्यक्रमात हशा पिकला.

Story img Loader