दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारापैंकी एक आहेत. अभिनयाप्रमाणेच त्यांच्या सौंदर्यावरही चाहते फिदा होते. त्यांचे केवळ देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते होते. ‘औलाद’, ‘लाडला’, ‘नगीणा’, ‘चालबाज’, ‘जुदाई’ अशा एक सो एक हिट चित्रपटांनी त्यांनी ८०चे दशक गाजवले. श्रीदेवी त्यांच्या कातिल व नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करायच्या.

श्रीदेवी यांनी चित्रपटात दिलेल्या बोल्ड सीनमुळे त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. अभिनयाचं कौतुक न होता फक्त चित्रपटातील अशा सीनमुळे ओळखली जाऊ लागल्याची खंत त्यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली होती. “तुम्ही चित्रपटात खूप छान दिसत होतात, असं जेव्हा चाहते म्हणायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. मी त्यांना काहीच उत्तर द्यायचे नाही. पण जेव्हा कोणी माझ्या अभिनयाचं कौतुक करायचं, तेव्हा मला स्वत:चाच अभिमान वाटायचा”, असं त्या म्हणाल्या होत्या.

हेही वाचा >> Video: दीड महिन्यांपूर्वी आईला गमावलं, आता वडिलांना शेवटचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर

श्रीदेवी चित्रपटात अनेकदा त्यांच्या साडीतील कातिल अदांमध्ये शरीरप्रदर्शन करताना दिसून आल्या. याबद्दलही त्यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना “असं जर असेल, तर सगळ्यात जास्त शरीरप्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्री नंबर वन असल्या पाहिजेत. मग तसं का नाही? साडीमध्ये जर मी सेक्सी दिसत असेल, तर यात मी काहीच करू शकत नाही. माझ्यापेक्षाही जास्त शरीरप्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आहेत. पण त्या सेक्सी दिसत नाहीत”, असं श्रीदेवी म्हणाल्या होत्या.

हेही वाचा >> आलिया-रणबीरच्या मुलीचं नाव ठरलं, ऋषी कपूर यांच्याशी असणार खास कनेक्शन

श्रीदेवी पुढे म्हणाल्या, “बॉलिवूडमधील माझा पहिला चित्रपट ‘हिंमतवाला’ सुपरहिट ठरला. त्यानंतर ‘सदमा’सारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारली होती. परंतु, तो चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे माझ्याकडे नेहमी ग्लॅमरस भूमिकांच्याच ऑफर आल्या, हे माझं दुर्देव आहे. पण मी एक उत्तम अभिनेत्रीही आहे, हे एक दिवस सिद्ध करुन दाखवेन”.  

श्रीदेवी यांना अभिनयाप्रमाणेच नृत्याचीही आवड होती. फेब्रुवारी २०१८मध्ये दुबईत त्यांचं निधन झालं. श्रीदेवी व बोनी कपूर यांना जान्हवी, खुशी या दोन मुली आहेत. जान्हवी कपूरही बॉलिवूडमध्ये सक्रिय असून लवकरच खुशी कपूरही अभिनय क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकणार आहे.

Story img Loader