दिवगंत अभिनेते देव आनंद हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते होते. ‘आमिर गरीब’, ‘बनारसी बापू’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हम दोनो’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. त्यांचे जगभरात लाखो चाहते होते. त्यांनी तरुणींनी अक्षरश: वेडं करुन सोडलं होतं.
देव आनंद यांच्या सौंदर्याची तरुणींना भूरळ पडली होती. त्यांची स्टाइल व फॅशनवर तरुणी फिदा असायच्या. देव आनंद चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले होते. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. तरुणींना वेडं करुन सोडणाऱ्या देवानंद यांची प्रेमकहाणी मात्र अर्धवटच राहिली होती. सुरैय्या नामक तरुणीवर त्यांचं प्रेम जडलं होतं. त्यांनी तिला प्रपोजही केलं होतं. परंतु, सुरैय्याकडून कोणतंच उत्तर न मिळाल्यामुळे त्यांची लव्हस्टोरी अपूर्ण राहिली.
हेही वाचा >> Video : हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मिथिला पालकर ट्रोल, उर्फी जावेदशी तुलना करत नेटकरी म्हणाले “पायपुसणी…”
देव आनंद यांनी याच मुलाखतीत त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्राबद्दल बोल्ड वक्तव्यही केलं होतं. अभिनेत्री शीला रमानी यांनी देव आनंद यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. “शीला रमानीमध्ये कोणती जादू होती?”, असा प्रश्न देव आनंद यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना देव आनंद “सेक्स करण्यात जादू असते. प्रत्येक तरुण मुलगी सेक्सी असते. त्या वेळेतही जादू असते. त्याकाळात केवळ शीला रमानी स्टेजवर डान्स करायची. आजच्या काळातही जर शीला रमानी असती तर लोकांनाही ती आवडली असती. वेळेबरोबर सगळं बदलून जातं. त्या काळात ती होती आज कोणीतरी दुसरी आहे”, असं म्हणाले होते.
हेही वाचा >> Video: शालिन भानोतचं शिव ठाकरेने तोंड पकडलं, जोरात ढकललं अन्….; ‘बिग बॉस’च्या घरात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
देव आनंद यांनी शीला रमानी यांच्याबाबत केलेलं बोल्ड वक्तव्य चर्चेत आलं होतं. “चित्रपट बनवणारे या सगळ्या गोष्टींचा विचार करतात. मी ही या परिस्थितीतून गेलो आहे”, असंही ते पुढे म्हणाले होते.