धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडियावरील सुंदर फोटोमुळे तर कधी जबरदस्त डान्समुळे चर्चेत असते. सध्या माधुरी ‘कलर्स टीव्ही’वरील ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. अशातच माधुरी दीक्षितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी ‘डान्स दीवाने’च्या सेटवर तयार होऊन जाताना दिसत आहे. व्हॅनिटी वॅनमधून बाहेर येताच अचानक एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन येते आणि माधुरीच्या मागेमागे धावत येत म्हणते, “माझा मुलगा तुम्हाला भेटू इच्छितो.” यावर माधुरी त्या छोट्या मुलाला हॅलो करते. त्यावर ती महिला तिच्या मुलाला म्हणते, “आंटीला हॅलो कर.” हे ऐकून माधुरी हसायला लागते.

हेही वाचा – “भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून…”, प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातला सगळ्यात अवघड प्रसंग, म्हणाला…

हेही वाचा – “आयुष्यात कधी भिणार नाही”, ट्रोलिंगविषयी प्रसाद ओकने मांडलं परखड मत, म्हणाला…

माधुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं आहे, “आंटी काय, आता हिच दीदीचं वय आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “माधुरी तू खूप सुंदर दिसत आहे.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नशीब आंटी हाक मारली आजी नाही.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आंटीला आंटी नाही म्हणणार तर काय म्हणणार?”

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षितने मल्टीकलरच्या लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर अभिनेत्रीने मोठे कानातले, बांगड्या घातल्या आहेत. नेहमी प्रमाणे माधुरीच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”

माधुरीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही वृत्तानुसार, ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात माधुरी दीक्षित चक्क भूताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता विद्या बालन व माधुरी दीक्षितला एकत्र पाहणं हे प्रेक्षकासाठी पर्वणी असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When madhuri dixit fan called her aunty video viral pps