बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या दमदार अभिनयासाठी आणि उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सध्या मोजकेच चित्रपट करत असली तरी एकेकाळी तिचा या इंडस्ट्रीत दबदबा होता. माधुरी दीक्षितने करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.
माधुरीने करिअरमध्ये अनेक कठीण पात्रं साकारली असून तिच्या काळातील बॉलीवूडमधील जवळपास सर्वच हिरोंबरोबर काम केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तिने एका खलनायकाच्या भीतीमुळे चित्रपटात सीन करण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर शूटिंगपूर्वी ती खूप रडली. हा खलनायक दुसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते रणजीत होय. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रणजीत यांनी स्वतःच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…
अभिनेते रणजीत हे त्यांना साकारलेल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. खलनायकांच्या भूमिका करणारे रणजीत यांना खऱ्या आयुष्यात महिला घाबरायच्या. अनेक अभिनेत्री त्यांच्याबरोबर काम करण्यात संकोच करायच्या. हा सगळा त्यांच्या नकारात्मक पात्रांचा प्रभाव होता. त्यांनी आपल्या नवीन मुलाखतीत सांगितलं की माधुरी दीक्षितने ‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपटात त्यांच्यासह काम करण्यास जवळपास नकार दिला होता. रणजीत यांना याबद्दल फारशी माहिती नव्हती. याची माहिती त्यांना अजय देवगणचे वडील आणि अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी दिली होती. ‘रेडिओ नशा’शी बोलताना रणजीत म्हणाले, “माधुरीने प्रेम प्रतिज्ञा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मेकअप करतानाच ती रडू लागली होती. तिने माझ्याबरोबर कोणताही सीन करणार नसल्याचं सांगितलं होतं.”
खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या
रणजीत पुढे म्हणाले, “मला माहित नव्हतं काय घडत आहे. मी फक्त दोन तास सेटवर यायचो. ती एका गरीब माणसाच्या मुलीची भूमिका करत होती, मला तिचे शोषण करायचे होते, अशी कथा होती. फाईट मास्टर वीरू यांनी सांगितलं होतं की ते नॉनस्टॉप शूट करतील. पण सीन पूर्ण झाल्यावर माझ्यामुळे कुणालाही काही अडचण आली नाही. सहसा लोक मला विचारायचे की सीन कसा होता, मात्र यावेळी सर्वांनी माधुरीला घेरले. ती म्हणाली की मी तिला स्पर्श केला हे तिला कळलं देखील नाही. हे माझं कौतुक होतं. मी प्रत्येक स्त्रीचा आदर करतो, मग मी त्यांना ओळखत असो वा नसो.”
रणजीत यांनी मुलाखतीत सांगितलं की चित्रपटांमधील त्यांच्या खलनायकाच्या प्रतिमेमुळे त्या काळात त्यांच्या लग्नात अडचणी आल्या होत्या. तसेच करिअरमधील एका टप्प्यानंतर त्यांना एकाच धाटणीच्या भूमिाक मिळू लागल्या होत्या. “पुन्हा पुन्हा तेच करावं लागायचं, साडी पकडायची, केस ओढायचे आणि शेवटी मार खावा लागायचा,” असं ते म्हणाले.