अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री परवीन बाबी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. चाहत्यांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा काळजाचा ठोका त्यांनी चुकवला होता. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबरोबरील प्रेमसंबंधाचाही बरीच चर्चा रंगली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९७७ मधील महेश भट्ट व परवीन बाबी यांच्या प्रेमसंबंधाचं प्रकरण बरंच गाजलं होतं. महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांच्यावरील प्रेमामुळे पत्नी सोनी रझदान व मुलगी पूजा भट्ट यांनाही सोडलं होतं. परवीन बाबींबरोबर ते राहू लागले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी परवीन बाबींबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला होता. “१९७९ मधील हा प्रसंग आहे. एकदा संध्याकाळी मी परवीनच्या जुहू येथील घरी तिच्या आईला बघण्यासाठी गेलो होतो. तिच्या आईला भेटल्यानंतर त्यांनी मला “परवीनला काय झालंय ते पाहा” असं सांगितलं. त्यानंतर मी परवीनच्या बेडरुममध्ये तिला पाहण्यासाठी गेलो”, असं महेश भट्ट यांनी सांगितलं.

हेही वाचा>> मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”

पुढे ते म्हणाले, “परवीनच्या बेडरुममध्ये परफ्युमचा सुगंध पसरलेला होता. परवीनने एका चित्रपटातील ड्रेस परिधान करत पेहराव केला होता. ती हातपाय घट्ट पकडून बसली होती. तिची चाल एका पशूसारखी मला भासली. तिच्या हातात किचनमधील चाकू होता. तू काय करतेस?, असं मी तिला विचारलं. त्यावर ती मला, शशश…काही बोलू नकोस. ह्या बेडरुममध्ये हेरगिरी यंत्र लावलेली आहेत. हे झुंबर ते माझ्यावर पाडणार आहेत”, असं म्हणत तिने माझा हात पकडून मला खोलीच्या बाहेर काढलं. तिच्या आईकडे बघून यापूर्वीही असं घडलेलं आहे, हे मला जाणवलं.

हेही वाचा>> “सनी लिओनी…”, हटके पोझमध्ये फोटोशूट केल्यामुळे सई ताम्हणकर ट्रोल

“एका मानसोपचारतज्ञाकडे मी परवीनला घेऊन गेलो होतो. तिला सिजोफ्रेनिया हा अनुवंशिक आजार असल्याचं त्यांनी मला सांगितलं. यावर उपचार म्हणून त्यांनी ड्रग थेरेपीचा सल्ला दिला होता. परंतु, याने फरक न पडल्यास तिला इलेक्ट्रिक शॉकही द्यावा लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं. पण मारण्याच्या भीतीने तिला झपाटलं होतं. एकदा माझ्या मित्राला भेटून परतत असताना तिने गाडीत बॉम्ब आहे. त्याची टिकटिक मला ऐकू येत आहे, असं म्हणत होती. त्यानंतर तिने गाडी चालू असतानाच दरवाजा उघडून पळायला सुरुवात केली. तिच्यामागोमाग तिला पकडण्यासाठी मी धावत होतो. कसं तरी मी तिला टॅक्सीत बसवून घरी सोडून आलो”, असा खुलासाही त्यांनी केला होता.