बॉलीवूडमधील एक अभिनेत्री जिच्या सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. या अभिनेत्रीला प्रेम करणं इतकं महागात पडलं की तिचं करिअरच संपलं. ही अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या प्रेमात पडली आणि त्याचे दुष्परिणाम तिला भोगावे लागले. तिला तुरुंगातही जावं लागलं. ही अभिनेत्री म्हणजे मोनिका बेदी होय. आज मोनिकाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिने एका मुलाखतीत तिच्या वादग्रस्त लव्ह लाइफबद्दल काय म्हटलं होतं, ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ताजमहल’ या तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मोनिका दिसायला खूपच सुंदर होती. तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिने बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरमध्ये सगळं सुरळीत चाललं असतानाच ती अबू सालेमच्या प्रेमात पडली आणि तिच्या करिअरला उतरती कळा लागली. इतकंच नाही तर तिला तुरुंगवासही भोगावा लागला आणि मुंबई सोडायची वेळ आली होती.

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

अबू सालेमच्या आवाजाच्या प्रेमात होती मोनिका

२०१४ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने अंडरवर्ल्ड डॉनबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. “आमचं बोलणं फोनवरून सुरू झालं होतं. त्यावेळी अबू सालेमने खरं नाव मला सांगितलं नव्हतं. त्याने मला सांगितलं की तो दुबईतील मोठा उद्योगपती आहे. हळूहळू आम्ही रोज बोलू लागलो आणि मी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले,” असं मोनिकाने सांगितलं होतं.

मोनिकाला माहीत नव्हतं डॉनचं खरं नाव

“जवळपास ९ महिने फोनवर बोलल्यानंतर आम्ही भेटण्याचा निर्णय घेतला. पण तो मुंबईला यायला तयार नव्हता म्हणून मी त्याला भेटायला दुबईला गेले. तिथे गेल्यावर मला कळलं की त्याचं खरं नाव अबू सालेम आहे. पण तेव्हा तो डॉन आहे हे मला माहीत नव्हते,” असं मोनिका म्हणाली होती. यासंदर्भात ‘एबीपी लाइव्ह’ ने वृत्त दिलं आहे.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

अबू सालेमबरोबर जावं लागलं तुरुंगात

“१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळल्यानंतर अबू सालेम दुबईहून अमेरिकेला गेला होता. त्याने मलाही तिथे बोलावले. पण तिथे गेल्यावर मला समजले की मी अडकले आहे आणि इथून बाहेर पडणं अशक्य आहे,” असं एका मुलाखतीत मोनिकाने सांगितलं होतं. २००५ मध्ये अबू आणि मोनिकाला पोर्तुगालमध्ये बनावट पासपोर्टसह अटक करण्यात आली होती. अबू सालेमसोबत मोनिकालाही तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातून सुटल्यानंतर मोनिका पंजाबमधील तिच्या गावी गेली होती, कारण मुंबईत तिला कोणीही घर द्यायला तयार नव्हतं.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

मोनिका बेदी सध्या काय करते?

मोनिका बेदीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या तिच्याकडे सध्या कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. छोट्या जाहिराती करून ती आपला उदरनिर्वाह करत आहे. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिच्या चाहत्यांबरोबर फोटो व व्हिडीओ रील्स शेअर करत असते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When monica bedi affair with underworld don abu salem ruined her bollywood career went to jail hrc