मागच्या भागात आपण पाहिलं की मुघल-ए-आझम चित्रपट तीनवेळा बंद पडूनही, के आसिफ यांनी संकटांचा सामना करूनही चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले. पण के आसिफ यांनी शूटिंग दरम्यान पृथ्वीराज कपूर यांना तापलेल्या वाळवंटात अनवाणी चालायला लावलं होतं, तसेच एकाएकी असं काहीतरी घडलं की दिलीप कुमार हा चित्रपट अर्ध्यावर सोडून जाण्याची धमकी के आसिफ यांना देत होते, इतकंच नाही तर संपूर्ण सिनेमा शूट करून झाल्यावर के आसिफ आधी केलेलं शूट कचऱ्याच्या डब्यात टाकून संपूर्ण चित्रपट पुन्हा शूट करायचं म्हणत होते. पण यामागचं कारण नेमकं काय, ते ‘गोष्ट पडद्यामागची’ या मालिकेतील आजच्या भागातून जाणून घेऊयात.
खूप कष्टाने पुन्हा चित्रपटाचं शूट सुरु झालं होतं, चित्रपट हळूहळू शूट होत होता, पृथ्वीराज कपूर हा चित्रपट संपवण्यासाठी विशेष प्रयत्न करीत होते. पण दिग्दर्शक के आसिफ आपल्याला हवा तसा शांतपणे चित्रपट पूर्ण करत होते आणि अशातच एकदा पृथ्वीराज कपूर आणि के आसिफ यांच्यात भांडण झालं. जयपूरमध्ये वाळवंटात चित्रपटाचा सेट लागला होता. पायाखाली तापलेली वाळू आणि वरून आग ओकत असलेला सूर्य चित्रीकरणाचं काम कठीण करत होता. आजच्यासारख्या त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन्स नसायच्या वाळवंटात चार तंबू गाडलेले होते आणि शूट सुरु झालं होतं आणि तेवढ्यात एका तंबूतून आवाज आला. “असिफ, तू पागल हो गया है.” हा आवाज पृथ्वीराज कपूर यांचा होता
“पापाजी, शॉट तो आप मै चाहता हूँ वैसेही दोगे. ठीक आहे. आपका शॉट ओके होने तक मै भी जुते नहीं पेहनूंगा.”
पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ –
गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.