दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींशी नानांचं नावही जोडलं गेलं. त्यापैकी मनीषा कोईराला. या दोघांच्या नात्याची इतक्या वर्षांनीही चर्चा होत असते. त्यांनी ‘अग्नीसाक्षी’, ‘युग पुरुष’, ‘खामोशी’ हे चित्रपट एकत्र केले. १९९६ मध्ये ‘अग्नी साक्षी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मनीषाचं विवेक मुशरनशी ब्रेकअप झालं होतं आणि ती नानांच्या प्रेमात पडली होती, असं म्हटलं जातं. त्यावेळी नाना विवाहित होते, पण ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते.

नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा खूप गाजल्या. मनीषा त्याबद्दल कधीच बोलत नाही, पण नाना पाटेकरांना मनीषाबद्दल काही विचारलं की ते उत्तर देतात. नाना व मनीषा यांचं काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअप झालं, असं म्हणतात. काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकरांना ‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईरालाबद्दल विचारण्यात आलं. त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं, ते जाणून घेऊयात.

Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Salman Khan
“त्याने माझ्या कानात गाणे…”, ‘मैंने प्यार किया’च्या सेटवर सलमान खानने केलेली ‘ही’ गोष्ट; भाग्यश्री म्हणाली, “तो फ्लर्ट…”
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
Alka Kubal
“त्या रोज पॅक अप झालं की…”, अलका कुबल यांनी सांगितली स्मिता पाटील यांची आठवण; म्हणाल्या…
prajakta mali reaction after suresh dhas apology
सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “अत्यंत मोठ्या मनाने माफी मागितल्यामुळे…”
video of a young woman is currently going viral on social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन्…धक्कादायक VIDEO
Happy New Year budget collection
९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ बॉलीवूड चित्रपट?

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

मनीषा कोईरालाबद्दल नाना पाटेकर म्हणालेले…

नाना पाटेकरांना मुलाखतीत १० व्यक्तींबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. बाळासाहेब ठाकरे, स्मिता पाटील, शरद पवार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान अशा दिग्गजांची नावं यात होती. यापैकीच एक नाव मनीषा कोईरालाचं होतं. तिचं नाव ऐकताच नाना यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत होती. “महान अभिनेत्री. तिला खूप कमी वयात कर्करोग झाला. तू ‘हीरामंडी’ पाहिलीस का? त्यात तिने खूप छान काम केलं आहे. मी सीरिज पाहिली,” असं नाना पाटेकर मनीषाबद्दल म्हणाले होते.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

मनीषा कोईरालाने २०२४ मध्ये आलेल्या ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. त्यानंतर ‘हीरामंडी’ पाहिल्यावर मनीषा कोईराला यांना शुभेच्छा दिल्या का? असं मुलाखतकाराने नाना पाटेकरांना विचारलं. ते उत्तर देत म्हणाले, “नाही. कदाचित तिचा फोन नंबर आता तो नाही, बदलला आहे.”

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

नाना पाटेकर व स्मिता पाटील यांची खूप चांगली मैत्री होती. स्मिता पाटील यांच्या निधनाबद्दल कळालं तेव्हा तुम्ही कुठे होता? असं विचारल्यावर नाना पाटेकर म्हणाले, “बाबा आमटेंसाठी शो सुरू होता, तिथेच मी होतो. मला गाडी तिच्यामुळेच शिकता आली. साडी घ्यायला सोबत न्यायची, कोणती साडी घ्यायचीय ते विचारायची. ती वेगळी होती, कमाल होती, खूप लवकर गेली. तिच्यासारखे लोक खूप कमी असतात. ती असती तर आताही इंडस्ट्रीत त्याच शिखरावर असती.” स्मिता पाटील यांच्यामुळेच सिनेसृष्टीत आल्याचं अनेकदा नाना पाटेकर सांगतात.

Story img Loader