राजेश खन्ना म्हणजे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानले जातात. बॉलिवूडच्या या लोकप्रिय ‘काका’चे अनेक किस्से आजवर आपण ऐकले असतील. १९२९ साली अमृतसर येथे जन्मलेले राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार म्हणून नावारूपाला आले. राजेश खन्ना आता आपल्यात नसले तरी आजही एकही स्टार त्यांचा एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपटांचा विक्रम कुणी मोडू शकलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर १९६९ ते १९७२ दरम्यान राजेश खन्ना यांनी बॅक टू बॅक १५ सुपरहिट चित्रपट दिले. यामुळेच राजेश खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार ही पदवी मिळाली. आजही एकही अभिनेता काकाचा हा विक्रम मोडू शकलेला नाही.

आणखी वाचा : ‘ओपनहायमर’ पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची भारतीयांबद्दल खोचक टिप्पणी; म्हणाले, “मला शंका…”

इतकं स्टारडम बघूनही याच बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याने राजेश खन्ना यांचा चांगलाच अपमान केला होता, अन् तोसुद्धा राजेश खन्ना यांच्या निधनानंतर. एव्हाना तुम्हाला कळलं असेलच की आपण नसीरुद्दीन शाह यांच्याबद्दल बोलत आहोत. राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना एक फालतू अभिनेता म्हणत हिणवले होते. यावर राजेश यांची पत्नी डिंपल कपाडिया हिने त्यांना चोख उत्तरही दिले होते.

डिंपल म्हणाल्या की, जर तुम्ही हयात असलेल्या व्यक्तीचा आदर करू शकत नसाल तर त्याच्या निधनानंतर तरी त्या व्यक्तीबद्दल आदराने भाष्य करावं. यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांची माफीदेखील मागितली होती. नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रख्यात लेखक जोडी सलीम-जावेद यांनीही नाराजी व्यक्त करत नसीरुद्दीन यांचे कान खेचले होते. जावेद अख्तर म्हणाले, की नसीरुद्दीन शाह यांना यशस्वी लोक फारसे आवडत नाहीत. दिलीप कुमार ते अमिताभ बच्चन या सगळ्यांबद्दल त्यांचे असेच विचार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When naseeruddin shah speaks says rajesh khanna was pathetic actor avn
Show comments