अभिनेत्री नीना गुप्ता यांनी १९८० च्या दशकात मुंबईत घर शोधण्याच्या आव्हानात्मक प्रवासाबद्दल सांगितलं. नीना यांनी आधीपासून घर भाड्याने घेणं टाळलं. एकदा त्यांनी दुसरा फ्लॅट घेण्यासाठी आधीचा फ्लॅट विकला होता. याचदरम्यान एकदा नीना यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. कारण त्यांना व मुलगी मसाबाला मध्यरात्री एका नातेवाईकाने घर सोडण्यास सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाखतीत नीना यांनी सांगितलं की त्यांनी एका बिल्डरच्या नवीन प्रकल्पात थ्री बीएचके फ्लॅट बूक केला होता. त्यांनी राहतं घर विकून या फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली होती. या काळात आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. फ्लॅटसाठी पैसे भरल्यानंतर जवळ पैसे नव्हते. त्यामुळे त्या काका-काकूंबरोबर राहायला गेल्या होत्या.

हेही वाचा – ‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

अचानक मध्यरात्री काढलं घराबाहेर…

नीना म्हणाल्या, “मी माझ्या काकूच्या घरी शिफ्ट झाले. आधीही मी त्यांच्याबरोबर राहत होते. माझं घर असतानाही मी त्यांच्याकडेच जास्त वेळ घालवायचे आणि फक्त झोपण्यासाठी माझ्या घरी जायचे. मसाबा लहान असल्यापासून माझी काकू मला मदत करायची, पण एकदा अचानक तिने मला मध्यरात्री घराबाहेर काढलं. माझ्याकडे पैसे नव्हते आणि राहायला जागा नव्हती. त्यावेळी मला बाळाला घेऊन कुठे जावं ते समजत नव्हतं.”

हेही वाचा –बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

नीना यांना काकांनी नंतर जुहू येथे एक रिकामा फ्लॅट दिला. तो २० वर्षांपासून बंद होता. धुळीने माखलेलं ते घर साफ केलं आणि नंतर काही काळातच त्यांना ते सोडायला सांगितलं. नीना म्हणाल्या, “मी त्यांच्याबरोबर शिफ्ट होण्याआधीच दोघांनाही सांगितलं होतं की माझ्याकडे आता घर नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे राहिलेलं तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा ते हो म्हणाले. नंतर मला घरातून बाहेर काढलं. त्यानंतर काकांना खूप वाईट वाटलं म्हणून त्यांनी मला त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या फ्लॅटमध्ये जुहूला पाठवलं. ते घर २० वर्षांपासून बंद होतं. लहान मुलगी असूनही मी ते घर स्वच्छ केलं, पण लवकरच त्यांनी मला ते सोडायला सांगितलं.”

हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

राहायला जागा नसल्याने नीना यांनी त्या बिल्डरशी संपर्क साधला, त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. मग बिल्डरने सगळे पैसे परत केले. त्या पैशांमधून नीना यांनी आराम नगरमध्ये घर खरेदी केलं आणि मग त्या मुलीसह तिथे राहायला गेल्या होत्या.

नीना गुप्ता १९८० च्या दशकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्या वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. १९८९ मध्ये त्यांनी मुलगी मसाबाला लग्न न करताच जन्म दिला आणि तिचा सांभाळ केला. नीना यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या शेवटच्या 1000 बेबीज सिनेमात दिसल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When neena gupta aunt threw her out after daughter masaba birth hrc