अभिनेत्री नीना गुप्ता व जॅकी श्रॉफ यांचा ‘मस्त में रहने का’ हा नवीन चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. आयुष्यातील एकटेपणावर व आर्थिक समस्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी १९८१ मध्ये मुंबईत आल्यानंतरचे त्यांचे संघर्षाचे दिवस आठवले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध पृथ्वी कॅफेत काम केलं होतं, याचा खुलासा केला.

नीना गुप्ता यांनी ‘इ-टाइम्स’ला सांगितलं की त्या जुहू येथील पृथ्वी थिएटरशी संलग्न असलेल्या प्रसिद्ध पृथ्वी कॅफेमध्ये भरीत बनवायच्या. फुकट जेवण मिळावं म्हणून त्या तिथे काम करायच्या. त्यावेळी नीना थिएटरमध्ये कामही करत होत्या. त्या त्यांच्या तेव्हाच्या प्रियकराबरोबर दिल्लीहून मुंबईत आल्या होत्या, कारण त्यांच्यामध्ये एकटं मुंबईत येण्याची हिम्मत नव्हती.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सॉफ्टवेअर इंजिनिअरशी केलं लग्न; सोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

नीना गुप्ता पृथ्वी कॅफेमध्ये फुकट काम करायच्या, जेणेकरून त्यांना फुकट जेवण मिळू शकेल. पण त्यांच्या या कामाची त्यांचा प्रियकर खिल्ली उडवायचा आणि म्हणायचा, “तुला थोडी तरी लाज वाटते का? तू मुंबईत नोकर व्हायला आली आहेस का?” असा खुलासा नीना यांनी केला. तसेच प्रियकराच्या या बोलण्याने आपल्याला राग आला होता. कारण तो फक्त त्यांना कमी लेखत नव्हता, तर त्यांच्याकडे सिगारेट विकत घेण्यासाठी पैसेही मागायचा, असंही त्यांनी सांगितलं.

कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये

नीना गुप्ता यांनी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. अनेक भूमिका साकारल्या, ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांनी मुंबईत आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच १९८२ मध्ये ‘साथ साथ’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यांनी ‘गांधी’, ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘लैला’ आणि इतर चित्रपटांमध्ये काम केलं. २०१८ साली आलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातून त्यांच्या करिअरची खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग सुरू झाली. त्यांनी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘चार्ली चोप्रा’ आणि ‘मस्त में रहने का’ हे चित्रपट केले आणि ‘पंचायत’ या लोकप्रिय सीरिजच्या तिन्ही पर्वात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Story img Loader