चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक काहीतरी वक्तव्य करू पाहत असतो. समाजावर, राजकारणावर, जातीव्यवस्थेवर आणि अशा बऱ्याच गोष्टींवर दिग्दर्शक चित्रपटातून भाष्य करू पाहतो. पण असे फार कमी दिग्दर्शक आहेत ज्यांना ही गोष्ट अगदी लीलया जमते. त्या काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे मणी रत्नम अन् त्यांचा हिंदीतील सर्वात वेगळा अन् हटके असा चित्रपट म्हणजे ‘दील से’. भारताच्या इशान्येकडील राज्यातल्या समस्या अन् ९० च्या दशकात तिथे फोफावलेला आतंकवाद यांच्यावर बेतलेली एक हटके पण डोकं सुन्न करणारी एक प्रेमकहाणी मणीरत्नम यांनी ‘दिल से’च्या माध्यमातून मांडली.

हा चित्रपट तेव्हा फारसा चालला नसला तरी कालांतराने त्यामागील गांभीर्य लोकांना समजलं अन् या चित्रपटाला क्लासिकचा दर्जा मिळाला. चित्रपटात शाहरुख खान व मनीषा कोइराला हे दोघे प्रमुख भूमिकेत होते तर प्रीती झिंटा ही एका छोट्याश्या सहाय्यक भूमिकेत होती. प्रीतीचा हा पहिलाच चित्रपट, या चित्रपटातून प्रीतीने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट असला तरी प्रीतीच्या गोड चेहेऱ्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या अभिनयाची चर्चा तर झालीच पण त्याबरोबरच या चित्रपटातील तिच्या नो-मेकअप लूकचीही जबरदस्त चर्चा झाली. यात प्रीतीच्या चेहेऱ्यावर तुम्हाला काडीचाही मेकअप पाहायला मिळणार नाही. उलट जेव्हा या चित्रपटाच्या सेटवर प्रीती मेक-अप करून आली तेव्हा दिग्दर्शक मणी रत्नम यांनी तिला चेहेरा धुवून यायला सांगितलं होतं.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर

आणखी वाचा : प्रसिद्ध कार डिझायनरने कपिल शर्माला घातला पाच कोटींचा गंडा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

चित्रपटातील एक क्लोज-अप शॉट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत प्रीतीने ती आठवण पुन्हा शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रीती लिहिते, “हा फोटो ‘दिल से’ चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आला होता. मी शाहरुख खान व मणी रत्नम सर यांच्याबरोबर काम करण्यास फारच उत्सुक होते. जेव्हा मणी सरांनी मला पाहिलं तेव्हा तए माझ्याकडे पाहून हसले अन् अत्यंत नम्र शब्दांत त्यानं मला चेहेरा धुवून यायला सांगितलं. मी म्हणाले पण माझा सगळा मेकअप खराब होईल. ते पुन्हा हसून मला म्हणाले, मला नेमकं तेच हवं आहे. मला पहिले वाटलं की ते मस्करी करत आहेत, पण तसं नव्हतं. संतोष सिवम यांचे आभार मानावे तितके कमी आहेत त्यांनी अगदी ‘दिल से’ माझं मेकअप नसलेलं सौंदर्य कॅमेरात अगदी उत्तमरित्या टिपलं.”

चित्रपटाची इतकी चर्चा होऊनदेखील आजवर मणी रत्नम यांनी ‘दिल से’ पाहिलेला नाही. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, “गेल्या २५ वर्षात मी ‘दिल से’ एकदाही पाहिलेला नाही, त्यामुळे नेमकं आता त्याचा काय परिणाम होत असेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. चित्रपटातील काही सीन्स फक्त मी पाहिले आहेत तेदेखील म्युट करून.” ‘दिल से’ला ए आर रेहमान यांनी संगीत दिलं तर गुलजार यांनी गाणी लिहिली. आजही ‘दिल से’ची चर्चा तरुण पिढीदेखील करते इतका हा चित्रपट रिलेटेबल आहे.

Story img Loader