बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. कधी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर कधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा सेलिब्रिटींकडून पब्लिसिटी स्टंटही केले जातात. न्यूड फोटोशूटमुळेही अनेक सेलिब्रिटी चर्चेचा विषय बनले होते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांची पत्नी व मॉडेल प्रोतिमा बेदीनेही न्यूड होत पब्लिसिटी स्टंट केला होता. त्यामुळे तिचा संसार अर्ध्यावरच मोडला होता.
बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांचा आज ७७वा वाढदिवस आहे. १९७१ साली ‘हलचल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे कबीर बेदी ७०-८०च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य केलं. हॉलिवूडमध्येही काम करत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारे कबीर बेदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले होते. कबीर बेदी यांनी एक दोन नव्हे तर तब्बल चार लग्न केली होती. १९६९मध्ये कबीर बेदी यांनी त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांच्यासह लग्नगाठ बांधली. प्रोतिमा या मॉडेल व डान्सर होत्या. परंतु, अवघ्या पाचच वर्षात त्यांचा संसार मोडला. १९७४ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि याला कारणीभूत ठरलं प्रोतिमा यांचं न्यूड फोटोशूट.
हेही वाचा>>सत्यजीत तांबेंनाही पडली ‘शार्क टँक इंडिया’ची भूरळ, पोस्ट शेअर करत म्हणाले…
प्रोतिमा यांनी मुंबईतील जुहू बीचवर विवस्त्र होत फोटोशूट केलं होतं. यामुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. नग्न होत त्या समुद्रकिनारी धावल्या होत्या. एका मॅगझीनसाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. कबीर बेदी यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत प्रोतिमाशी घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगताना या घटनेचाही उल्लेख केला होता. “आम्ही तेव्हा मलेशियात होतो. प्रोतिमा माझ्या जवळ आली आणि मला मी स्ट्रीक केलं आहे, असं म्हणाली. एखाद्या गोष्टीच्या निषेधार्थ स्टेज किंवा रस्त्यावर विविस्त्र होण्याला स्ट्रिकिंग असं म्हणतात. स्ट्रिकिंग करताना कोणीतरी फोटो काढून ते मॅगझीनमध्ये छापल्याचं ती मला म्हणाली. ती माझ्याशी खोटं बोलली. परंतु, हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं नंतर मला कळलं”, असं ते म्हणाले होते.
हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो
पुढे ते म्हणाले, “प्रोतिमाच्या या प्रसंगामुळे मला धक्का बसला होता. परंतु, त्याचदरम्यान मी संकोदन साठी शूट करत होतो. शिवाय एका युरोपियन टीव्ही सीरिजची ऑफरही मला आली होती. माझं कामातून मन विचलित होऊ नये, यासाठी मी प्रोतिमाबरोबरचं माझं लग्न कायम ठेवलं. आम्ही फक्त एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्याचं प्रयत्न करत होतो. परंतु, याचा काहीच उपयोग झाला नाही. या नात्यात तणाव आल्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलांनाही या गोष्टी माहीत आहेत”.
हेही वाचा>> …अन् बेस्ट फ्रेंडच्या क्रशने तेजस्विनी पंडितलाच केलं प्रपोज; अभिनेत्रीने स्वत:च सांगितला किस्सा
प्रोतिमा व कबीर बेदी यांना पूजा बेदी व सिद्धार्थ बेदी ही दोन अपत्य आहेत. सिद्धार्थने १९९७ साली आत्महत्या करत जीवन संपवलं. तर पूजा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. प्रोतिमा यांनी १९९८ साली अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. त्यांनी त्याचं नाव बदलून प्रोतिमा गौरी असं केलं होतं. १९९८मध्येच त्या कैलास मानसरोवर यात्रेला गेल्या होत्या. परंतु, तेथे झालेल्या भूस्खलनात त्यांचा मृत्यू झाला.