बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुखने पुन्हा सिद्ध केलं आहे की बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह तो आहे. ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. याबरोबरक हा चित्रपट काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला. बऱ्याच राजकीय पक्षांनी याविरोधात प्रचारही केला होता. शाहरुखच्या चित्रपटाला विरोध व्हावा ही काही पहिली वेळ नाही. शाहरुखचा चित्रपट आणि राजकीय पक्षांचा विरोध हे समीकरण आपण बऱ्याचदा अनुभवलं आहे.

अशाच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने शाहरुखकडे खुल्या मंचावर राजकारण्यांसाठी सल्ला मागितला होता. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी २००८ च्या एका कार्यक्रमात खुद्द शाहरुख खानकडे सल्ला मागितला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराचंही लोकांनी कौतुक केलं आहे.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
maharashtra assembly election 2024, airoli,
ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?

आणखी वाचा : सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला दिलेल्या खास भेटवस्तूची किंमत ऐकून व्हाल थक्क; चाहत्यांनीही केलं कौतुक

“राजकारण्यांना तू काय सल्ला देऊ इच्छितो?” या राहुल गांधींच्या प्रश्नावर शाहरुख खान पहिले हसला आणि मग म्हणाला, “मला आनंद वाटला हा साधा प्रश्न ऐकून, म्हणजे मी एक असा सल्ला देऊ ज्याचे सर्व राजकारणी पालन करतील, आणि आपला देश अद्भुत बनेल…शिवाय तुम्ही हा प्रश्न मला विचारला याची मी दाद देतो. मी खोटे बोलतो, फसवतो आणि जगण्यासाठी फसवणूक करतो कारण मी एक अभिनेता आहे, हा सगळा दिखावा आहे. माझ्याकडे ठोस सल्ला असा काही नाही.”

आणखी वाचा : पहिला भारतीय चित्रपट ट्रेलर कोणता? ट्रेलर ही संकल्पना कधीपासून सुरू झाली? जाणून घ्या इतिहास

अशी मस्करी करत शाहरुख पुढे म्हणाला, “देश चालवणाऱ्या किंवा ज्यांच्या मनात देश चालवण्याची इच्छा आहे अशा लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. ही अत्यंत निस्वार्थ सेवा आहे. टेबलाखालून पैसे घेणे किंवा इतर गैरव्यवहार न करता आपण योग्य मार्ग अवलंबला तर आपण सर्वजण पैसे कमवू, आपण सर्व आनंदी होऊ आणि आपण एक महान आणि अभिमानी राष्ट्र म्हणून उदयास येऊ. त्यामुळे सर्व राजकारण्यांना माझा एकच सल्ला आहे की कृपया शक्य तितके प्रामाणिक रहा.”

शाहरुखच्या या उत्तरावर सगळ्यांनीच टाळ्या वाजवत त्याच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं. २००८ च्या या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपा नेते प्रकाश जावडेकर, रवी शंकर प्रसाद यांच्यासारखे नेते उपस्थित होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुखने ‘पठाण’मधून कमबॅक केला आहे. आता त्याच्या आगामी ‘डंकी’ आणि ‘जवान’ या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.