‘आखिरी खत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या राजेश खन्ना यांनी एक-दोन नव्हे तर सलग तब्बल १७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्याबाबतही बरीच चर्चा रंगली होती. राजेश खन्ना हे त्यांच्या अभिनयाबरोबरच मनस्वी अन् फटकळ बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. चित्रपटसृष्टीत काम करताना बऱ्याच कलाकारांना राजेश खन्ना यांच्या या स्वभावाचा अनुभव आलेला आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानसुद्धा सेटवर लोकांना राजेश खन्ना यांच्या या स्वभावाचा अनुभव आला आहे. असाच एक किस्सा ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्याबरोबरही घडला होता. या घटनेनंतर अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांच्या नात्यात कटुता आली होती. ‘आंचल’ या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली होती. या चित्रपटात रेखा आणि राखी यांच्यासह राजेश खन्ना आणि अमोल पालेकरही महत्त्वाच्या भूमिकेत होते.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”

आणखी वाचा : मुस्लीम असल्याने सासरच्या मंडळींनी बदललेलं शाहरुख खानचं नाव; खुद्द गौरीने केलेला खुलासा

‘आंचल’ चित्रपटात अमोल पालेकर यांनी राजेश खन्नाच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमोल पालेकर यांनी साकारलेल्या पात्राला आपल्या भावावर संशय येऊ लागतो की त्याचे आपल्या पत्नीबरोबर अफेअर सुरू आहे, पण या चित्रपटात अमोल पालेकर हे चुकीचे ठरल्याचं स्पष्ट होतं. यानंतर एका दृश्यादरम्यान अमोल पालेकर यांना राजेश खन्ना यांची गुढग्यावर बसून माफी मागावी लागते.

या सीनमध्ये राजेश खन्ना यांनी अमोल पालेकरला लाथ मारावी अशी सूचना दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी दिली होती. अमोल पालेकर यांनी मात्र हा सीन करायला साफ नकार दिला होता, पण अनिल गांगुली यांना चित्रपटात हा सीन हवाच होता. अखेर दिग्दर्शकाने अमोल पालेकर यांना हा सीन करण्यासाठी राजी केलं पण शूटिंगदरम्यान त्यांनी राजेश खन्ना यांना हा लाथ मारायचा सीन इशारा देऊन करवून घेतला. राजेश खन्ना यांनी लाथ मारली, सीन ओके झाला आणि सीननंतर राजेश खन्ना आणि अनिल गांगुली यांना हसू आवरलं नाही.

आणखी वाचा : Ghar Banduk Biryani Review : गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? जाणून घ्या

यानंतर मात्र अमोल पालेकर चांगलेच संतापले. या दोघांच्या हसण्यामुळे त्यांचा राग आणखी अनावर झाला. अमोल पालेकर हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते आणि ते राजेश खन्ना यांच्यापेक्षा ज्येष्ठ होते. इतकंच नाही तर अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांची चांगली मैत्री होती पण या एका सीननंतर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. ‘आंचल’नंतर अमोल पालेकर यांनी राजेश खन्ना किंवा अनिल गांगुली यांच्याबरोबर कधीही काम केले नाही.

Story img Loader