दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची प्रेमकहाणी एकेकाळी बॉलीवूडमध्ये प्रचंड चर्चेत होती. अवघ्या १६ वर्षांच्या डिंपल यांनी १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्नांशी लग्नगाठ बांधली होती. पण लग्न करताना राजेश यांनी डिंपलसमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे लग्नानंतर डिंपल यांना चित्रपटात काम करणं बंद करावं लागेल. सुपरस्टारशी लग्न करण्याचा उत्साह इतका होता की डिंपल यांनी ती अट आनंदाने मान्य केली होती.

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”

‘बॉबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच डिंपल यांनी मार्च १९७३ मध्ये राजेश खन्नांशी लग्न केले. पण, अवघ्या १० वर्षांच्या संसारानंतर गोष्टी बदलल्या आणि १९८४ पासून डिंपल व राजेश वेगळे राहू लागले. वेगळे झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. “तुम्ही एका तरुण मुलीचं भावविश्व संपवलं असं तुम्हाला वाटत नाही का?” असा प्रश्न राजेश यांना विचारण्यात आला होता. यावर राजेश खन्ना म्हणाले होते, “मी डिंपलशी लग्न केलं कारण मला अंजूला (अभिनेत्री अंजू महेंद्रू) माझ्यापासून दूर ठेवायचं होतं. आम्ही वेगळे झालो होतो पण, मी नेहमीप्रमाणे तिच्याकडे परत जाईन, असं मला वाटत होतं. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात मी पहिल्यांदा डिंपलला भेटलो. तिथे मी तिचा हात धरला होता आणि ती मला म्हणाली होती, “तू हा हात कायमचा धरशील का?” मला धक्का बसला होता, पण एवढ्या गर्दीत मी तिला उत्तर देऊ शकलो नव्हतो.”

‘गदर २’ देशात ब्लॉकबस्टर पण परदेशात ठरला फ्लॉप, बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे निराशाजनक

राजेश पुढे म्हणाले, “मी डिंपलला म्हणालो होतो जर तुला माझी पत्नी व्हायचं असेल, तर ‘बॉबी’ संपल्यानंतर तू कधीही चित्रपट करणार नाहीस. ती म्हणालेली, ‘मी राज कपूरबरोबर काम केलंय आणि आता राजेश खन्ना माझे पती असतील, मला आणखी काय हवं?’ सुरुवातीला सगळं ठिक होतं, ती आणि मी दोघेही प्रयत्न करत होतो कारण आम्हा दोघांनाही माहीत होतं की लग्नानंतर प्रेम होईलच. पण, तसं झालं नाही. लग्नानंतर सर्व काही उद्ध्वस्त झालं. तिला नाराज राहत असे, स्वत:कडे दुर्लक्ष करायची, ती लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू लागली, दिवस-रात्र पत्ते खेळू लागली. तिला माझे निर्माते, दिग्दर्शक, माझे सहकलाकार आवडत नसल्याचं ती मला म्हणायची. आता ती स्वतः त्या सर्वांबरोबर काम करत आहे.”

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

नात्यातील दुराव्याबद्दल राजेश खन्नांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं. “होय मी थोडा कठोर आणि स्वार्थी होतो. पण, तिने तिच्या वचनाचं पालन करावं अशी माझी इच्छा होती. मी तिला माझ्या कार्टर रोडच्या घरात कधीही मेकअप करू देणार नाही. त्यासाठी तिला तिच्या जुहूतील घरी परत जावे लागेल, असं सांगितलं होतं. कारण मला एका अभिनेत्रीशीच लग्न करायचं असतं तर मी टॉपच्या अभिनेत्रीशी लग्न केलं असतं. डिंपल ड्रॉईंग रुम डॉलच्या रुपात नाही तर बायकोच्या रुपात हवी होती. तुम्ही मला जुनाट विचारांचा म्हणू शकता. पण दोन शिफ्ट काम करून रात्री घरी परत आल्यानंतर गरम जेवण देणारी आणि माझ्या शेजारी बसलेली पत्नी मला पाहिजे होती. मी घरी असताना बाहेर असणारी बायको मला नको होती,” असं राजेश खन्ना म्हणाले होते.

इतकंच नाही तर डिंपलने आपल्याला मानसिकरित्या फसवल्याचंही राजेश खन्नांनी म्हटलं होतं. दरम्यान, डिंपल व राजेश तब्बल घटस्फोट २७ वर्षे दूर राहिले होते.