भारतातील सध्याच्या काळातील लोकप्रिय गायकांची यादी काढायची म्हंटली तर सोनू निगमचं नाव ही सर्वात अग्रस्थानी घ्यावं लागेल. ८० आणि ९० च्या दशकात सोनूने एकहाती बॉलिवूडवर आणि संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही सोनू त्याच्या लाईव्ह शोजमधून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. सोनूने हिंदीसह इतरही भाषांमध्ये भरपूर गाणी म्हंटली आहेत.

सध्या सोनू पार्श्वगायन फारसं करत नाही, यामागे नेमकं कारण काय याबद्दल सोनूने भाष्य केलं आहे. ‘झुम एंटरटेंमेंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने यावर वक्तव्य केलं आहे. अभिनेते हे गायकांसाठी उभे राहत नाही असा आरोप सोनूने केला आहे आणि यविषयी बोलताना त्याने शाहरुख खानचाही उल्लेख केला आहे. याबरोबरच त्याने विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांचंही कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : “मी आजही शाहरुखसाठी गाऊ शकतो, पण…” सोनू निगमने व्यक्त केली मनातील खंत

एकेकाळी शाहरुखसाठी कित्येक हीट गाणी देणारा सोनू म्हणाला, “अभिनेते हे गायकांच्या बाजूने उभे राहतात किंवा त्यांच्यासाठी मध्यस्थी करतात ही गोष्ट होताना दिसत नाही. जर असं घडलं असतं तर मी आजही शाहरुख खानला आवाज दिला असता. अभिनेते संगीत दिग्दर्शकांना त्यांना काही उत्तम पर्याय देतात पण त्यापलीकडे जाऊन त्या गायकासाठी ते झगडत नाहीत.” अशी खंत सोनूने व्यक्त केली.

इतकंच नव्हे तर यावेळी त्याने उदाहरण देताना आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटादरम्यानचं उदाहरण दिलं. सोनू म्हणला, “जेव्हा ‘पीके’साठी मी ‘भगवान है कहा रे तू’ हे गाणं मी रेकॉर्ड केलं तेव्हा म्युझिक कंपनीबरोबर माझे बरेच मतभेद होते. मी हे गाणं गावं अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती, परंतु त्यावेळी राजकुमार हिरानी आणि विधु विनोद चोप्रा अडून राहिले की हे गाणं सोनूच गाणार, अन् मग मला ते गाणं मिळालं.”

आणखी वाचा : नेहा पेंडसेने केले Eggs Freeze; मातृत्त्वाबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मला आई व्हायचंय पण…”

नुकतंच ‘रेड एफएम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने रेहमानच्या एका गाण्यावरही टीका केली आहे. रेहमान यांच्या एका गाण्याबद्दल मुलाखतीत सोनू म्हणाला, “चिगी विगी हे खूप वाईट गाणं आहे. मला हे गाणं अजिबात आवडत नाही. रेहमान यांनी इतकं वाईट गाणं का बनवलं हे मला कळत नाही. कधी कधी रेहमानकडूनही चुका होऊ शकतात.”

Story img Loader