कार्तिक आर्यन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी लोकप्रिय असलेल्या कार्तिकला लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीच्या गाड्या आहेत, यापैकी एका गाडीचा किस्सा त्याने सांगितला आहे.

२०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ मधून करिअरची सुरुवात करणारा कार्तिक आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. त्याचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झाला होता. करोना नंतरच्या काळात सिनेमागृहे पुन्हा उघडल्यानंतर जे मोजकेच चित्रपट हिट झाले होते, त्यापैकी एक कार्तिकचा हा सिनेमा होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यानंतर, टी-सीरीजचे मालक भुषण कुमार यांनी कार्तिक आर्यनला ४.७ कोटी रुपयांची मॅक्लारेन जीटी कार भेट दिली होती, त्याच कारशी संबंधित हा किस्सा आहे.

Success story of kamal khushlani owner of mufti jeans once borrowed money now owning crores business
फक्त १० हजार रुपयांच्या कर्जाने सुरू केलं काम, आता आहे कोटींचं साम्राज्य; वाचा कोणता व्यवसाय करतात कमल खुशलानी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी

मुंबई सोडून कुटुंबासह विदेशात स्थायिक झालीये मराठमोळी अभिनेत्री; कारण सांगत म्हणाली, “मला कामाच्या ऑफर…”

कार्तिकला भुषण कुमार यांनी ही कार भेट केल्यावर त्याने ती काही काळ चालवली होती, मग ती गॅरेजमध्ये पार्क केली होती. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला, “मी ही कार गॅरेजमध्ये पार्क केली होती, पण तिचे मॅट्स उंदरांनी कुरतडले, त्यामुळे मी बराच काळ ती कार वापरू शकलो नाही. मी दुसरी कार वापरत होतो. मॅक्लारेन जीटी कारमधील कुरतडलेले मॅट्स दुरुस्त करून घेण्यासाठी मला लाखो रुपये मोजावे लागले होते.”

शाहरुख खान मध्यरात्री कर्मचाऱ्याच्या झोपडपट्टीतील घरी जायचा, प्रसिद्ध कॉमेडियनचा दावा; म्हणाला, “मी तिथे भाड्याने…”

भुषण कुमार यांनी कार्तिकला भेट दिलेली मॅक्लारेन जीटी ही या ब्रँडची भारतातील पहिली कार होती. ही केशरी रंगाची कार आहे. ही एक सुपर कार आहे. या कारचा ताशी वेग ३२६.७ किलोमीटर आहे. ती ३.१ सेकंदात एका किमीवरून १०० किमी वेग गाठू शकते. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या कारचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

‘भूल भुलैया २’ आधी कार्तिक आणि भुषण यांनी पहिल्यांदा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या हिट चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट २०१८ मध्ये आला होता. ‘भूल भुलैया २’ च्या यशानंतर त्यांनी क्रिती सेनॉन व कार्तिकबरोबर ‘शेहजादा’ बनवला, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. कार्तिक पुढे कबीर खानच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १४ जुनला रिलीज होतोय. तसेच तो या वर्षाच्या अखेरीस ‘भूल भुलैया ३’ मध्ये भुषण कुमारबरोबर काम करत आहे.

Story img Loader