बॉलीवूड अभिनेता आमिर खान अभिनयासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येतो. आमिरने दोन लग्नं केली होती आणि दोन्हीवेळा त्याचे घटस्फोट झाले. आमिरचं पहिलं लग्न रीना दत्ताशी झालं होतं. त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन अपत्ये आहेत आणि त्याचं दुसरं लग्न किरण रावशी झालं होतं, त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. आमिरने आता पहिल्या पत्नीचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा तिने अभिनेत्याला मारलं होतं.

आमिर खानने नुकतीच कपिल शर्माच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. आमिरने त्याची पहिली पत्नी रीना दत्ताबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला. शोमध्ये कपिलने त्याला विचारलं की लोक कसे वागतात याचं तो अभिनेता म्हणून निरीक्षण करतो का? यावर आमिरने मोठ्या मुलाच्या जन्मावेळचा किस्सा सांगितला.

गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…

आमिर म्हणाला, आमचा मुलगा जुनैदचा जन्म होणार होता, त्यादिवसचा हा प्रसंग आहे. रीनाला प्रसूती वेदना होत होत्या. तिचा त्रास खूप वाढला होता, त्यावेळी मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण रीनाने मला जोरदार चापट लगावली व बडबड बंद कर असं ती म्हणाली. इतकंच नाही तर तिने आमिरच्या हाताचा चावा घेतला होता.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

रीना दत्ताने कानाखाली मारल्यानंतर काय शिकला ते आमिरने सांगितलं. यानंतर माझ्या आजूबाजूला काय घडत आहे, याची जाणीवर मला झाली. यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रसूतीच्या वेळी महिलांना जेव्हा खूप जास्त त्रास होतो तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते. मी जेव्हा रीनाला वेदना होताना पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते, पण ते हावभाव आश्चर्याचे होते. इतक्या वेदना खरंच होऊ शकतात का? असे हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”

आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्ताशी लग्न केलं. या लग्नापासून त्यांना जुनैद आणि आयरा खान ही दोन अपत्ये आहेत. मात्र, १६ वर्षांनंतर ते विभक्त झाले. नंतर त्याने किरण रावशी लग्न केलं, पण हे लग्नही मोडलं. किरण व आमिर विभक्त झाले असले तरी मुलगा आझादची जबाबदारी एकत्र पार पाडतात.

Story img Loader