Reena Roy : बॉलीवूडमधील काही अभिनेत्री सारख्याच दिसतात, असं तुम्ही ऐकलं असेल. झरीन खान कतरिना कैफ सारखी दिसते, तर स्नेहा उल्लाल ही ऐश्वर्या रायसारखी दिसते; अशी सोशल मीडियावर खूपदा चर्चा होते. सोनाक्षी सिन्हा ही ज्येष्ठ अभिनेत्री रीना रॉय यांच्यासारखी दिसते, असं खूपदा म्हटलं जातं. एकदा रीना यांनी स्वतःच यावर प्रतिक्रिया दिली होती.

रीना रॉय या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ७० आणि ८० च्या दशकात त्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. रीना रॉय त्यांच्या चित्रपटांबरोबरच लव्ह लाईफमुळेही त्याकाळी खूप चर्चेत राहिल्या होती. त्यांच्या व शत्रुघ्न सिन्हा यांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. दोघांचं अफेअर होतं मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांचं नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपलं होतं. शत्रुघ्न हे विवाहित होते आणि त्यांना पत्नीला सोडायचं नव्हतं.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

हेही वाचा – “खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीचं नाव पूनम सिन्हा असून त्यांना लव्ह आणि कुश ही दोन मुलं व सोनाक्षी ही मुलगी आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरचं नातं संपल्यावर रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं होतं. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. मात्र सोनाक्षी सिन्हा ही रीना रॉय यांच्यासारखी दिसते, असं अनेकदा म्हटलं जातं.

हेही वाचा – सुपरस्टार वडिलांइतकं ‘या’ अभिनेत्याला मिळालं नाही यश, २३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दिले १९ फ्लॉप चित्रपट

सोनाक्षी दिसायला हुबेहुब रीना यांच्यासारखी दिसते, याबाबत एकदा खुद्द रीना रॉय यांना विचारण्यात आलं होतं. “सोनाक्षी माझ्यासारखी दिसते, हा निव्वळ योगायोग आहे, कधी कधी असं घडतं. अभिनेत्री जितेंद्र यांची आई आणि माझी आई सारख्याच दिसत असल्याने त्यांनाही जुळ्या बहिणी म्हटलं जायचं,” असं रीना रॉय एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

दरम्यान, रीना रॉय यां पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानबरोबरचं लग्न फार काळ टिकलं नव्हतं. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव समन खान आहे. तर, शत्रुघ्न सिन्हा यांची एकुलती एक मुलगी सोनाक्षी हिने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं.

Story img Loader