रीना रॉय या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७० आणि ८० च्या दशकात रीना रॉय त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या लव्ह लाईफमुळेही खूप चर्चेत होत्या. त्यावेळी अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरच्या त्याच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एंड ऑफ द चाप्टर” बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत गैरहजर असलेल्या रुचिरा जाधवची पोस्ट; रोहितबद्दल म्हणाली…

दोघांचं अफेअर होतं मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचे नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपुष्टात आलं. शत्रुघ्न हे विवाहीत होते आणि ते पत्नीला सोडण्यास तयार नव्हते. शत्रुघ्न सिन्हा यांचं लग्न झालेलं होतं, त्यांच्या पत्नीचं नाव पूनम सिन्हा असून त्यांना सोनाक्षी, लव्ह आणि कुश ही तीन अपत्ये आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं होतं. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री रीना रॉय यांच्यासारखी दिसते, असं अनेकदा म्हटलं जातं.

“गळफास घेतल्यानंतर तुनिषा जिवंत होती, पण शिझान खानने…” अभिनेत्रीच्या आईचा धक्कादायक दावा

सोनाक्षी दिसायला हुबेहुब रीना यांच्याप्रमाणे दिसते. त्यामुळे बऱ्याचदा रीना याच सोनाक्षीच्या आई असून त्यांनी हे लपवल्याच्या चर्चा होत असतात. एकदा तर, या चर्चांवर रीना यांनी स्वतःच भाष्य केलं होतं. “सोनाक्षी माझ्यासारखी दिसते, हा निव्वळ योगायोग आहे, कधी कधी असं घडतं. अभिनेत्री जितेंद्र यांची आई आणि माझी आई सारख्याच दिसतात, त्यामुळे त्यांनाही जुळ्या बहिणी म्हटलं जायचं,” असं रीना रॉय एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

Video: “शिवरायांनी दिलेलं वचन चार पिढ्यांनंतर बाजीराव पेशवेंनी…” शरद पोंक्षेंनी सांगितला बाजीरावांचा मोठेपणा

दरम्यान, रीना रॉय यांचं क्रिकेटर मोहसिन खान यांच्याबरोबरचं लग्न फार काळ टिकलं नव्हतं. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव समन खान आहे. दोघांच्या घटस्फोटानंतर मुलगी समनची कस्टडी रीना यांना मिळाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When reena roy said why ex shatrughan sinha daughter sonakshi sinha looks like her hrc