बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व सदाबहार अभिनेत्री रेखा यांचं एकेकाळी अफेअर होतं. दोघांचं नात संपून पाच दशकांपेक्षा जास्त काळ उलटला आहे, पण अजुनही बऱ्याचदा त्यांच्या अफेअरची चर्चा होताना दिसते. नातं संपल्यानंतर बिग बी व रेखा यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. पण, अनेकदा रेखा व बिग बींच्या पत्नी जया बच्चन एकमेकांच्या समोरासमोर आल्या. त्यावेळी या दोघींची प्रतिक्रिया काय होती, त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”
जया बच्चन आणि रेखा अनेक प्रसंगी समोरासमोर आल्या आहेत. दोघीही एकमेकांना आनंदाने व आदराने भेटतात. अशाच एका जुन्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ एका अवॉर्ड शोचा आहे. या व्हिडीओमध्ये रेखा यांनी सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. त्या जया बच्चन यांच्या दिशेने चालत येतात, दोघी एकमेकांकडे पाहतात आणि मग एकमेकींना मिठी मारतात. तिथे उभे असलेले लोक लगेच फोटो काढू लागतात आणि व्हिडीओही बनवतात. दोघी एकमेकांशी बोलतात आणि नंतर पोज देतात.
दरम्यान, जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि रेखा या तिघांनी ‘सिलसिला’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता, पण त्यानंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी कधीही स्क्रीन शेअर केली नाही.