आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रेखा यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण चित्रपटांव्यतिरिक्त त्या त्यांचं खासगी आयुष्य आणि बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचं लव्ह लाइफ, लग्न याची बरीच चर्चा त्याकाळी झाली होती. पण याशिवाय त्यांनी एकेकाळी पुरुष आणि शरीरसंबंध याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बरीच खळबळ उडाली होती.

लग्नानंतर १२ वर्षे आई होऊ शकली नव्हती मंदिरा बेदी, मनोरंजनसृष्टीला जबाबदार धरत म्हणालेली, “हे क्षेत्र क्रूर…”

रेखा यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधीत काही किस्से त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहेत. या पुस्तकात त्यांच्या अशा काही वक्तव्यांबद्दल लिहिलं गेलं आहे. जी वक्तव्ये बराच काळ चर्चेत राहिली होती. एकदा रेखा यांनी पुरुष आणि शरीरसंबंध यावर खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ज्याची त्याकाळी बरीच चर्चा झाली होती. रेखा यांच्या आत्मचरित्रानुसार एकदा त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘जर तुम्हाला पुरुषाशी जवळीक साधायची असेल तर हे तुम्ही फक्त शरीरसंबंधांच्या माध्यमातूनच करू शकता. तुम्ही जोपर्यंत त्या पुरुषासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी जवळीक साधू शकणार नाही.’ रेखा यांच्या या वक्तव्यानं त्यावेळी बरीच खळबळ माजली होती.

आवडता मराठी चित्रपट कोणता? रोहित शेट्टी म्हणाला, “मला निळू फुलेंचा…”

रेखा यांनी एकदा लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं योग्य असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर असे विचार नसलेल्या लोकांना ढोंगी म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, ‘जर लग्नाआधी कोणी शरीरसंबंध ठेवत असेल तर हे नैसर्गिक आहे. लोक म्हणत असतील की, मुलींनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवू नये तर ते लोक ढोंगी आहेत.’ रेखा यांची अभिनय कारकिर्द यशस्वी ठरली असली तरी त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्या सातत्यानं चर्चेत राहिल्या होत्या.

Story img Loader