रोहित शेट्टी बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. आज रोहित शेट्टीचा वाढदिवस आहे. त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक मराठी कलाकार पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी आलेल्या त्याच्या सर्कस चित्रपटामध्येही काही मराठी कलाकार झळकले होते. त्यावेळी त्याला मराठी कलाकारांना घेण्यामागचं कारण विचारण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर या मराठी कलाकारांनी काम केलं होतं. रोहितने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने मराठी कलाकारांना संधी देण्याचं कारण सांगितलं होतं.“तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस, असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. यामागे काहीतरी कारण आहे. मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात”, असं म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचं कौतुक केलं होतं.

Oscar Awards 2023: ऑस्कर स्वीकारण्यासाठी मंचावर साडी नेसून पोहोचलेल्या गुनीत मोंगा कोण आहेत?

यावेळी रोहित शेट्टीने चित्रपटाच्या कमाईबद्दलही भाष्य केलं होतं. “मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो” असं रोहित म्हणाला होता. दरम्यान, रोहित सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी अॅक्शन सीन शूट करताना रोहितला दुखापत झाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When rohit shetty revealed why he takes marathi actors in his movies hrc