संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष लोटली परंतु त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. या चित्रपटाने आजवर अनेक पुरस्कार मिळविले. याबरोबरच शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय यांच्या कामाची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली. भन्साळी यांच्या सेट्स आणि वेशभूषेची तर विशेष चर्चा होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही गोष्ट बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल की या चित्रपटात शाहरुख खानसह बॉलिवूडचा नवाब म्हणजेच सैफ अली खानही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता, पण काही कारणास्तव सैफला ती भूमिका मिळाली नाही. २००१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सैफने याबद्दल भाष्य केलं होतं. ‘देवदास’मध्ये सैफला प्रथम चुन्नीलाल या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा : ‘G-20 समिट’चा शाहरुख खानच्या ‘जवान’ला बसणार फटका; दिल्लीतील चित्रपटगृहं राहणार बंद?

त्यावेळी मात्र ही भूमिका सोडून सैफने ‘रेहना है तेरे दिल में’मधील सहाय्यक भूमिकेला होकार दिला. त्यावेळी मानधनावरुन गैरसमज झाल्याचं सैफने स्पष्ट केलं होतं. सैफ मुलाखतीमध्ये म्हणाला, “देवदासमधील ज्या पात्रासाठी मला विचारण्यात आलं त्यापेक्षा वासू यांच्या चित्रपटातील पात्र मला जास्त आवडलं. संजय आणि माझ्यामध्ये मानधनावरून काही गैरसमज होते, मी ती भूमिका नाकारली नव्हती, आणि मी अगदी फारच किंमत सांगितली होती असंही नाही. माझ्याशी यावर चर्चा न करताच संजय यांनी हा विषय बंद केला.”

इतकंच नव्हे तर या भूमिकेसाठी आपण योग्य नसल्याचंही सैफने स्पष्ट केलं. याबरोबरच सैफला ‘कुछ कुछ होता है’मधील सलमानच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, त्या भूमिकेला नकार द्यायचा मात्र त्याला पश्चात्ताप झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. देवदासमधील ‘चुन्नीलाल’ ही भूमिका नंतर अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्याकडे गेली अन् प्रेक्षकांनाही जॅकी यांची अदाकारी चांगलीच पसंत पडली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When saif ali khan was replaced in sanjay leela bhansali devdas without discussion avn