सलमान खान व ऐश्वर्या राय एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, हे सर्वश्रूत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवरून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली आणि नंतर काही काळांनी ते वेगळे झाले. सलमान व ऐश्वर्याचं ब्रेकअप विवेक ओबेरॉयमुळे झालं होतं, असं म्हणतात. विवेक ऐश्वर्याच्या आयुष्यात आला आणि ऐश्वर्याने सलमानशी नातं तोडलं. यानंतर विवेक व सलमान यांच्यातील वादही खूप चर्चेत राहिला होता.
ऐश्वर्या रायमुळे सलमान खान व विवेक ओबेरॉयचा वाद झाला होता, हा वाद म्हणजे मुर्खपणा होता, असं सलमानच्या वडिलांना वाटतं. सलीम खान यांनी एका मुलाखतीत सलमान आणि विवेक यांच्यातील भांडणाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्यांची एक जुनी मुलाखत आता पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सलमान आणि विवेक दोघेही भावुक झाले होते, असं म्हटलं होतं. दोघांनीही फार विचार न करता हे भांडण केलं होतं, असं मत सलीम खान यांनी व्यक्त केलं.
अजय देवगणचा ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यावर एकाच महिन्यात आला OTT वर; पण आहे ‘हा’ मोठा ट्विस्ट
या मुलाखतीत सलीम खान यांना विवेक आणि सलमान यांच्यातील भांडणाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते काय म्हणाले होते, ते जाणून घेऊयात. “कोणत्याही भावनिक समस्येवर तर्कशुद्ध उपाय नसतोच. सलमान आणि विवेक दोघेही भावुक झाले होते आणि त्यांनी विचार न करता हे भांडण केलं. काही वर्षांनी त्यांना समजेल की त्यांनी एका फालतू गोष्टीसाठी भांडण केलं होतं आणि जिच्यासाठी ते भांडले तिला दुसरं कोणी घेऊन गेलं किंवा ती निघून गेली आणि हे दोघेही त्याच ठिकाणी आहेत,” असं सलीम म्हणाले होते.
२५ वर्षांपूर्वी आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात सलमान व ऐश्वर्याने एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकले नाही आणि दोन वर्षातच ते वेगळे झाले. यानंतर ऐश्वर्याने विवेकला डेट करायला सुरुवात केली. याच कारणावरून विवेक आणि सलमानमध्ये भांडण झाले होते. सलमानने विवेकला धमकीही दिली होती विवेकने एका पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला होता.
आता या तिघांबद्दल बोलायचं झाल्यास सलमान खान अजुनही अविवाहित आहे. तर विवेक ओबेरॉयने २०१० मध्ये प्रियांका अल्वाशी लग्न केलं. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. ऐश्वर्याने रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगी आहे. त्यांची मुलगी आराध्या १२ वर्षांची आहे.