बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पलक तिवारीने सलमान खानबद्दल वक्तव्य केलं होतं. सलमानने सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचं पलकने स्पष्ट केलं होतं. एकदा सेटवर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला सलमानने कपडे बदलायला लावले होते.

‘एक था टायगर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा किस्सा घडला होता. या चित्रपटातील एका गाण्यासाठी कतरिनाने डीप नेक असलेला शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. कतरिनाचा हा ड्रेस सलमानला अजिबात आवडला नव्हता. त्याने कतरिनाला ड्रेस बदलण्यास सांगितले. त्यावर कतरिना दिग्दर्शकांनी मला हा ड्रेस घालायला सांगितल्याचं सलमानला म्हणाली होती. त्यानंतर सलमान खानने चित्रपटाचे दिग्दर्शक रजत शर्मा यांच्याशी बोलून गाण्यासाठी अशी ड्रेसची आवश्यकता नसल्याचं त्यांना सांगितलं.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”

हेही वाचा>> “मला रणबीर कपूरबरोबर रोमान्स…” ऋता दुर्गुळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली “त्याचे डोळे…”

सलमानच्या मते, तो ड्रेस कतरिनाच्या साइजचा नव्हता. “खूप साऱ्या मुली होत्या ज्यांनी तोकडे कपडे घातले होते. जोपर्यंत आपल्या मुली योग्यप्रकारे कपडे घालत आहेत, तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही,” असंही सलमान म्हणाला होता.

हेही वाचा>> प्रियांका चोप्राच्या घरी छापेमारी झाल्यावर टॉवेलमध्ये असलेल्या शाहीद कपूरने उघडलेला दरवाजा अन्…; अभिनेत्री सत्य सांगत म्हणालेली…

दरम्यान, सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री पूजा हेगडे, पलक तिवारी, शेहनाज गिल, दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू या कलाकरांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader