‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली. या सीरिजमध्ये असलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली. त्यापैकी एक भूमिका म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैतची भूमिका. कुब्राने सीरिजमध्ये कुक्कूची भूमिका साकारली होती. ही भूमिका एका तृतियपंथी स्त्रीची होती, पण सर्वात प्रथम ती सलमान खानच्या एका चित्रपटात दिसली होती. त्या अनुभवाबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

सलमान खानच्या २०११ सालच्या सुपरहीट ‘रेडी’ या चित्रपटात कुब्रा सैतने एका मोलकरणीची छोटी भूमिका केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कुब्राने त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर सलमान कसा उशिरा यायचा आणि इतरांचा कसा खोळंबा व्हायचा याबद्दल भाष्य केलं आहे.

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…

आणखी वाचा : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतली ख्रिस्तिआनो रोनाल्डो लिओनेल मेस्सीची भेट; ‘हे’ होतं निमित्त

याविषयी बोलताना ती म्हणाली, “मी तेव्हा शूटिंगसाठी पहाटे ५.३० वाजता हॉटेलवरुन निघायचे. मला सकाळी ब्रेकफास्टला तेव्हा फक्त सफरचंदच देत असे, मी पुन्हा ब्रेकफास्टची मागणी केली, ते पुन्हा मला सफरचंदच देत असत. शूटिंग पहिले १० ला सुरू होईल असं सांगण्यात आलं, मग दहाचे अकरा झाले, अकराचे बारा झाले.”

पुढे ती म्हणाली, “नंतर पावणे तीनच्या सुमारास सेटवर थोडी लगबग दिसू लागली, कुणीतरी महत्त्वाची व्यक्ती येणार होती, ती म्हणजे चित्रपटाचा हीरो म्हणजेच खुद्द सलमान खान. आम्ही एका गोल्फ कोर्सच्या सीनचं शूटिंग करत होतो. सलमान खान आरामशीर पावणे तीन वाजता आला आणि म्हणाला, आपण लंच ब्रेक घेऊया का?” त्यावेळी सलमानचे हे वागणं पाहून कुब्रा चांगलीच चकित झाली होती, कारण तिने सकाळपासून केवळ २ सफरचंदच खाल्ली होती.

या गोष्टीतूनही काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असं कुब्राने मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, “मी यातूनही काहीतरी चांगलंच शिकून घेतलं. सलमान खान सेटवर प्रत्येक सहकलाकाराला बोलावून एकत्रच त्यांच्याबरोबर जेवत असे. ही गोष्ट नक्कीच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.”

Story img Loader