सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. इतकंच नव्हे तर यंदाच्या ‘फिल्मफेअर २०२३’ या सोहळ्याची सूत्रसंचालनाची जवाबदारी सलमान खानकडे सोपवण्यात आली आहे. नुकतंच सलमानने ‘फिल्मफेअर’च्या प्रेसमीट मध्ये हजेरी लावली.

यादरम्यान सलमानने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला अन् सगळ्या प्रश्नांची त्याच्या खास शैलीत त्याने उत्तरं दिली. याच कार्यक्रमात सलमान खानने ९० च्या दशकात फिल्मफेअरसाठी एकदा मंचवार नृत्य करण्यास नकार दिला होता. त्या घटनेबद्दल सलमानने या कार्यक्रमात खुलासा केला आहे. त्यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या एका आयोजकाने सलमान खानला मंचावर परफॉर्म करण्यास सांगितलं होतं आणि असं केल्यास त्याला पुरस्कारही मिळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Anuj Thapan, High Court, Salman Khan, Anuj Thapan latest news
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण : आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही – उच्च न्यायालय
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”
Salman khan baba siddique
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या आधी सलमान खान होता हल्लेखोरांच्या रडारवर; आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा!

आणखी वाचा : “मी, शाहरुख, आमिर, अजय, अक्षय मिळून…” नव्या कलाकारांबरोबरच्या स्पर्धेबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य

१९९० च्या फिल्मफेअर सोहळ्यात सलमान खानला ‘मैंने प्यार कीया’साठी उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळणार होता, पण जेव्हा उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जेव्हा जॅकी श्रॉफ यांना ‘परींदा’ या चित्रपटासाठी देण्यात येणार असल्याचं समजताच सलमान निराश झाला. याविषयी सलमान म्हणाला, “मी त्या सोहळ्यात परफॉर्म करणार होतो आणि त्यासाठी मला पुरस्कारही मिळणार होता. ही गोष्ट जशी माझ्या वडिलांना समजली त्यांनी आयोजकांची चांगलीच कानउघडणी केली. तेव्हा मी प्रथमच मंचावर परफॉर्म करणार होतो आणि मी बॅकस्टेजला जाऊन नाचण्यास नकार दिला. जॅकीला पुरस्कार मिळणार आहे याचा मला आनंद होताच, त्याने उत्तम काम केलं होतं, पण ही गोष्ट प्रथमच माझ्याबाबतीत घडल्याने मी नाराज झालो.”

आणखी वाचा : “कोण ए आर रेहमान?” अलका याग्निक यांनी ‘रोजा’मधील गाणी गाण्यास दिलेला नकार, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

इतकंच नाही तर सलमानने नकार दिल्यावर आयोजकांनी सलमानला एक चांगली रक्कम देऊ केली होती. त्याबद्दल सलमान म्हणाला, “मी नृत्य सादर करू शकणार नाही असं सांगितल्यावर त्यांनी मला काही पैसे देऊ केले, मी त्यांना रक्कम विचारली त्यावर मी त्यांना जी रक्कम सांगितली ती ते देऊ करत होते त्यापेक्षा पाचपट अधिक होती. अखेर त्या आयोजकांनी ही गोष्ट कोणाला न सांगायची विनंती केली.” सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader