Salman Khan Blackbuck Case: सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत आहेत. १९९८ मध्ये सलमान खान, सैफ अली खान, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनी ‘हम साथ-साथ हैं’ या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजस्थानमधील एका गावात काळवीटाची शिकार केल्याचा सलमान खानवर झाला. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि नंतर जामीन मंजूर करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेला आता २६ वर्षे उलटली आहेत. इतक्या वर्षात हा खटला अनेकदा बंद झाला आणि पुन्हा उघडण्यात आला. २०१६ मध्ये त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तो पुन्हा दोषी ठरला आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. या घटनेमुळे सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला. बिश्नोई समाज काळवीटांना पवित्र मानतो, त्यामुळे या गँगकडून आतापर्यंत अनेकदा सलमानला धमक्या आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबारही झाला होता. तसेच नुकतीच राजकारणी व सलमानचे मित्र बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

हेही वाचा – Video: बिश्नोई गँगकडून धमक्या अन् बिग बॉस १८चे शूटिंग; सलमान खान स्पष्टच म्हणाला, “कसम खुदा की…”

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पुन्हा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच सर्वांदरम्यान सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो त्याच्यावर लागलेले काळवीट शिकारीचे आरोप नाकारताना दिसत आहे. हा व्हिडीओ २००८ सालचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा – सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान मनातलं बोलला सलमान खान? म्हणाला, “मला बिग बॉसच्या सेटवर…”

सलमान खान काय म्हणाला?

आपण काळवीटाची शिकार केली नव्हती असं सलमानने या मुलाखतीत म्हटलं होतं. काळवीट लुप्त होत असलेला प्राणी आहे, हे माहीत असूनही सलमान त्याची शिकार करेल, असं वाटत नाही असं मुलाखतकार म्हणाली. त्यावर “त्यामागची कथा खूप मोठी आहे. काळवीटाची शिकार करणारा मी नव्हतोच”, असं सलमान म्हणतो. मात्र तू स्वतःवर घेतलंस असं मुलाखतकार विचारते, यावर सलमान फक्त “नाही नाही” इतकं म्हणतो. तू कोणाकडेही बोट दाखवलं नाहीस, असं मुलाखतकार म्हणाल्यावर “आता काहीच अर्थ नाही” असं सलमान खान म्हणतो. याच मुलाखतीत सलमानला त्याचा जेलमधील अनुभव कसा होता असं विचारल्यावर तो ‘खूप मजा आली’ असे उपरोधात्मक उत्तर तो देतो.

हेही वाचा – बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाल्यास सलमान खान सध्या बिग बॉस 18 होस्ट करत आहे. तसेच त्याने रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’साठी आजपासून शूटिंग सुरू केलं आहे. तो त्याच्या २०१० मधील ‘दबंग’ चित्रपटातील लोकप्रिय भूमिका चुलबूल पांडेच्या भूमिकेत तो कॅमिओ शूट करणार आहे. या व्यतिरिक्त सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये रश्मिका मंदानाही असेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When salman khan said he was not the one who shot blackbuck see old video hrc